Lokmat Money >शेअर बाजार > एक मोठी घोषणा अन् शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, 51 रुपयांच्या शेअरला 20 टक्क्यांचे अपर सर्किट

एक मोठी घोषणा अन् शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, 51 रुपयांच्या शेअरला 20 टक्क्यांचे अपर सर्किट

स्मॉल कॅप कंपनी Naapbooks Limited च्या शेअरलाही 20 टक्क्यांचे अपर सर्किट लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 10:36 PM2023-02-03T22:36:59+5:302023-02-03T22:37:53+5:30

स्मॉल कॅप कंपनी Naapbooks Limited च्या शेअरलाही 20 टक्क्यांचे अपर सर्किट लागले आहे.

A big announcement and the stock took rocket speed, upper circuit of 20 percent at Rs 51 per share | एक मोठी घोषणा अन् शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, 51 रुपयांच्या शेअरला 20 टक्क्यांचे अपर सर्किट

एक मोठी घोषणा अन् शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, 51 रुपयांच्या शेअरला 20 टक्क्यांचे अपर सर्किट

गेल्या काही दिवसांच्या दबावानंतर शुक्रवारी शेअर बाजारात चांगली स्थिती दिसून आली. अशा स्थितीत अनेक लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सना अपर सर्किट लागले. स्मॉल कॅप कंपनी Naapbooks Limited च्या शेअरलाही 20 टक्क्यांचे अपर सर्किट लागले आहे. आयटी सेक्टरशी संबंधित या कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर, कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. महत्वाचे म्हणजे, या कंपनीचा आईपीओ 2021 मध्ये आला होता.

का केली घोषणा -
Naapbooks लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. Naapbooks ने बीएसईला दिलेल्या माहितीनुसार ही बैठक 7 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत फंड जमवण्यासंदर्भात चर्चा होईल. याच बरोबर, राईट इश्यूद्वारे शेअर्स जारी करून निधी उभारण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.

शेअरचा भाव - 
बीएसई इंडेक्सवर Naapbooks च्या शेअरचा भाव 69.60 रुपयांवर आहे. ट्रेडिंगदरम्यान हा शेअर 51 रुपयांच्या लो  लेव्हलपर्यंत गेला होता. कालच्या तुलनेत या शेअरमध्ये आज 20% ची तेजी दिसून आली. शेअरची 52 आठवड्यांतील उच्चपातळी 90 रुपये आहे. जी सप्टेंबर 2022 मध्ये होती.

शेअरचा परफॉर्मन्स -
वेळ                    परतावा
1 महिना        39.20 टक्के
6 महिना        24.29 टक्के
1 वर्ष          20.00 टक्के

Web Title: A big announcement and the stock took rocket speed, upper circuit of 20 percent at Rs 51 per share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.