Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाहनांवर आता लागणार इंधन प्रकारानुसार स्टीकर्स

वाहनांवर आता लागणार इंधन प्रकारानुसार स्टीकर्स

वाहनांमधील इंधनाच्या प्रकाराचा संकेत देण्यासाठी वेगवेगळ्या रंगातील होलोग्राम आधारित रंगीत स्टिकर लावण्याचा केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्वीकारला आहे.

By अोंकार करंबेळकर | Published: August 14, 2018 06:20 AM2018-08-14T06:20:53+5:302018-08-14T06:23:18+5:30

वाहनांमधील इंधनाच्या प्रकाराचा संकेत देण्यासाठी वेगवेगळ्या रंगातील होलोग्राम आधारित रंगीत स्टिकर लावण्याचा केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्वीकारला आहे.

Stickers according to the type of fuel that will be required on the vehicles | वाहनांवर आता लागणार इंधन प्रकारानुसार स्टीकर्स

वाहनांवर आता लागणार इंधन प्रकारानुसार स्टीकर्स

नवी दिल्ली : वाहनांमधील इंधनाच्या प्रकाराचा संकेत देण्यासाठी वेगवेगळ्या रंगातील होलोग्राम आधारित रंगीत स्टिकर लावण्याचा केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्वीकारला आहे.
न्यायमूर्ती मदन बी. लोकुर, न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने मंत्रालयाला स्पष्ट केले की, होलोग्राम आधारित हलक्या निळ्या रंगाचे स्टिकर पेट्रोल आणि सीएनजी वाहनांसाठी असेल, तर नारंगी रंगाचे होलोग्राम आधारित स्टिकर डिझेल वाहनांवर लावले जाईल.
न्यायालयाने मंत्रालयाला सांगितले की, दिल्ली परिसरात चालणाऱ्या वाहनांसाठी रंगीत स्टिकर वापरण्यास ३० सप्टेंबरपर्यंत सुुरुवात करावी. मंत्रालयाकडून हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नाडकर्णी यांना न्यायालयाने सांगितले की, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांसाठी हिरव्या रंगाच्या नंबरप्लेटचा वापर करण्याबाबत विचार केला जावा. वायू प्रदूषणाबाबत न्यायमित्राची भूमिका पार पाडत असलेल्या अ‍ॅड. अपराजिता सिंह यांनी यापूर्वी सूचना केली होती की, वाहनांमधील इंधनाची ओळख होण्यासाठी रंगीत स्टिकरचा उपयोग केला जावा. (वृत्तसंस्था)

Web Title: Stickers according to the type of fuel that will be required on the vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.