Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBIच्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा! आता फक्त एका कॉलवर 'ही' सर्व कामे होणार 

SBIच्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा! आता फक्त एका कॉलवर 'ही' सर्व कामे होणार 

state bank of india : कोरोना संकट काळात भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसची Contactless Service) सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 01:45 PM2021-05-08T13:45:16+5:302021-05-08T13:54:12+5:30

state bank of india : कोरोना संकट काळात भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसची Contactless Service) सुरूवात केली आहे.

state bank of india sbi issue toll free number for customers check details | SBIच्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा! आता फक्त एका कॉलवर 'ही' सर्व कामे होणार 

SBIच्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा! आता फक्त एका कॉलवर 'ही' सर्व कामे होणार 

HighlightsSBI ने आपल्या ग्राहकांसाठी टोल फ्री नंबर जारी केला आहे.SBI चे जवळपास 44 कोटीहून अधिक ग्राहक आहेत.

नवी  दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Second wave of corona) देशात हाहाकार माजला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिरिस्थित तुम्ही घरीच राहून सुरक्षित राहू शकता. कोरोना संकट काळात भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसची Contactless Service) सुरूवात केली आहे. आता ग्राहक घरीच बसून फोनवरून सुद्धा बँकेशी संबंधित अनेक कामे करू शकणार आहेत. (state bank of india sbi issue toll free number for customers check details)

SBI जारी केला टोल फ्री नंबर
SBI ने आपल्या ग्राहकांसाठी टोल फ्री नंबर जारी केला आहे. बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, "घरीच राहा, सुरक्षित राहा... आम्ही तुमची सेवा करण्यासाठी तिथे आहोत. SBI तुम्हाला एक कॉन्टॅक्टलेस सेवा देत आहे, जी तुमच्या तात्काळ बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करेल. आमच्या टोल फ्री नंबर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करा. "

फोनवर मिळतील सर्व सुविधा
SBI ने ट्विटसोबत एक व्हिडिओ सुद्धा जारी केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, या नंबरवर कॉल करून ग्राहक कोण-कोणत्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. व्हिडिओनुसार, अकाऊंट बॅलन्स आणि लास्ट 5 ट्रान्जक्शन, एटीएमला बंद किंवा चालू करणे, एटीएम पिन किंवा पिन जेनेरेट करणे, नवीन एटीएमसाठी अप्लाय करण्यासाठी या टोल फ्री नंबरवर ग्राहक कॉल करू शकतात.  दरम्यान,  SBI चे जवळपास 44 कोटीहून अधिक ग्राहक आहेत.

(SBI आजपासून 'या' लोकांच्या खात्यात 2489 कोटी जमा करणार!)

 

Web Title: state bank of india sbi issue toll free number for customers check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.