Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI आणि IOCL ने आणलं कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड, पाहा, कोणाला होणार अधिक फायदा...

SBI आणि IOCL ने आणलं कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड, पाहा, कोणाला होणार अधिक फायदा...

contactless rupay debit card : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडने (Indian Oil Corporation Limited) संयुक्तपणे को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड सुरू करण्याची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 12:37 PM2021-01-08T12:37:48+5:302021-01-08T12:39:54+5:30

contactless rupay debit card : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडने (Indian Oil Corporation Limited) संयुक्तपणे को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड सुरू करण्याची घोषणा केली आहे.

state bank of india and iocl launch contactless rupay debit card | SBI आणि IOCL ने आणलं कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड, पाहा, कोणाला होणार अधिक फायदा...

SBI आणि IOCL ने आणलं कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड, पाहा, कोणाला होणार अधिक फायदा...

Highlightsएसबीआय-आयओसीएल कॉन्टॅक्टलेस रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून 'टॅप अँड गो' फीटरद्वारे पाच हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट देखील केले जाऊ शकते.

नवी दिल्ली : जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी दरमहा अधिक खर्च करत असाल तर आपल्यासाठी ही चांगली बातमी आहे. आता बाजारात एक नवीन डेबिट कार्ड (Debit Card) बाजारात आणले गेले आहे, जे तुमच्या पैशांची बचत करण्यास उपयुक्त ठरेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडने (Indian Oil Corporation Limited) संयुक्तपणे को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड सुरू करण्याची घोषणा केली आहे.

हे कार्ड संपूर्ण देशात सुरू करण्यात आले आहे. याद्वारे इंडियन ऑईल स्टेशनवर 200 रुपये खर्च केल्यानंतर ग्राहकांना 6 पट रिवॉर्ड पॉइंट्स आणि 0.75 टक्के लॉयल्टी  पॉइंट्स मिळतील. याचबरोबर, ग्राहक रेस्टॉरंट, चित्रपट, किराणा आणि युटिलिटी बिलांच्या किंमतीवर रिवॉर्ड पॉइंट्स कमवू शकतात आणि ते रीडीम करु शकतात. इंधन खरेदी करण्यासाठी महिन्याची मर्यादा नाही. हे डेबिट कार्ड भारतात कोठेही वापरले जाऊ शकते. यासाठी एसबीआयच्या मुख्य शाखेत जाऊन कार्डसाठी अर्ज करू शकता.

नुकतेच आरबीआयद्वारे यंदा 'टॅप अँड गो' फीचरनुसार 5000 रुपयांपर्यंत देय देण्यास मान्यता दिल्यानंतर कॉन्टॅक्टलेल पेमेंट्स वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर, एसबीआय-आयओसीएल कॉन्टॅक्टलेस रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून 'टॅप अँड गो' फीटरद्वारे पाच हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट देखील केले जाऊ शकते.

"या को-ब्रांडेड कार्डमध्ये 'टॅप अँड पे' टेक्निकसह अनेक आकर्षक ऑफर्स मिळतील. कार्डधारकांना केवळ इंधन खरेदीचा एक फायद्याचा अनुभव मिळणार नाही तर हे सुरक्षितपणे ग्राहकांच्या रोजच्या खरेदीला सुलभ बनवेल", असे एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी सांगितले.
 

Web Title: state bank of india and iocl launch contactless rupay debit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.