Lokmat Money > बिझनेस न्यूज > SpiceJet ची शानदार ऑफर, केवळ 899 रुपयांत करा हवाई सफर!

SpiceJet ची शानदार ऑफर, केवळ 899 रुपयांत करा हवाई सफर!

SpiceJet : अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात कंपनीने या ऑफर अंतर्गत स्वतंत्र तिकीट व्हाउचर जाहीर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 03:13 PM2021-01-13T15:13:24+5:302021-01-13T15:15:52+5:30

SpiceJet : अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात कंपनीने या ऑफर अंतर्गत स्वतंत्र तिकीट व्हाउचर जाहीर केले आहे.

spicejet offers flight tickets from 899 rs in new book befikar sale | SpiceJet ची शानदार ऑफर, केवळ 899 रुपयांत करा हवाई सफर!

SpiceJet ची शानदार ऑफर, केवळ 899 रुपयांत करा हवाई सफर!

Highlightsया सेलमध्ये देशांतर्गत प्रवासाचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होत आहे.याशिवाय कोणत्याही शुल्काशिवाय तिकिटांची तारीख बदलण्याची व रद्द करण्याची सुविधा देखील देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत स्पाइसजेटने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी खास 'Book Befikar Sale' आणला आहे.

या सेलमध्ये देशांतर्गत प्रवासाचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होत आहे. या सेलमार्फत आजपासून (13 जानेवारी) तिकिट बुकिंग सुरू झाले असून याची अंतिम तारीख 17 जानेवारी आहे. या सेलद्वारे तिकिट बुकिंग केल्यास 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रवास करता येणार आहे.

'Book Befikar Sale' मध्ये देशांतर्गत उड्डाणाचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होत आहे. याशिवाय कोणत्याही शुल्काशिवाय तिकिटांची तारीख बदलण्याची व रद्द करण्याची सुविधा देखील देण्यात येत आहे. अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात कंपनीने या ऑफर अंतर्गत स्वतंत्र तिकीट व्हाउचर जाहीर केले आहे.

कंपनीने म्हटले आहे की, फ्लाइट व्हाउचरची किंमत बुक केलेल्या तिकिटाच्या बेस भाड्याइतकीच असेल. ग्राहक जेव्हा या सेल ऑफरद्वारे तिकिट बुकिंग करतात, तेव्हा त्याला प्रत्येक बुकिंगसाठी जास्तीत जास्त 1000 रुपयांचे व्हाउचर मिळेल. हे व्हाउचर भविष्यात तिकिट बुकिंगसाठी वापरता येईल.

हे फ्लाइट व्हाउचर 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वैध असतील. फक्त देशांतर्गत उड्डाणांवर हे लागू असतील. या व्हाउचरला कमीतकमी 5,500 रुपयांच्या व्यवहाराच्या रक्कमेसोबत नव्याने बुकिंगवर पूर्तता केली जाऊ शकते. या ऑफरची संपूर्ण माहिती विमान कंपनीने आपल्या www.SpiceJet.com या संकेतस्थळावर दिली आहे. 

दरम्यान, "ही सूट केवळ एकतर्फी भाड्यावर लागू होईल. ही ऑफर इतर कोणत्याही ऑफरबरोबर जोडली जाऊ शकत नाही किंवा ती ग्रुप बुकिंगवर लागू केली जाऊ शकत नाही, " असे स्पाइसजेट म्हटले आहे.
 

Web Title: spicejet offers flight tickets from 899 rs in new book befikar sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.