Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदी गडगडली तीन हजार रुपयांनी, सोन्यातही घसरण

चांदी गडगडली तीन हजार रुपयांनी, सोन्यातही घसरण

सोन्यातही २०० रुपयांची घसरण; सट्टा बाजाराचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:39 AM2021-11-16T06:39:43+5:302021-11-16T06:40:15+5:30

सोन्यातही २०० रुपयांची घसरण; सट्टा बाजाराचा परिणाम

Silver plunged by Rs 3,000, gold fell | चांदी गडगडली तीन हजार रुपयांनी, सोन्यातही घसरण

चांदी गडगडली तीन हजार रुपयांनी, सोन्यातही घसरण

Highlightsएरव्ही अमेरिकन डॉलरचे दर वधारल्यास सोन्या-चांदीचेही भाव वाढतात. मात्र, सोमवारी डॉलरचे दर काहीसे वधारले तरी चांदीत तीन हजार तर सोन्यात २०० रुपयांची घसरण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क 
जळगाव : दिवाळीच्या काळात मोठी दरवाढ झालेल्या चांदीमध्ये सोमवारी तीन हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे चांदी ६५ हजार रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात २०० रुपयांची घसरण होऊन, सोने ४९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. सट्टा बाजारातील घडामोडींमुळे ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

गेल्या महिन्याभरापासून सातत्याने सोन्या-चांदीत भाववाढ होत गेली. मात्र, सट्टा बाजारात अचानक दलालांनी चांदीची विक्री वाढविल्याने सोमवारी चांदीत थेट तीन हजार रुपयांची घसरण झाली. सोन्याच्याही भावात २०० रुपयांची घसरण होऊन दर ४९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. डॉलरचे दर वधारूनही घसरण

एरव्ही अमेरिकन डॉलरचे दर वधारल्यास सोन्या-चांदीचेही भाव वाढतात. मात्र, सोमवारी डॉलरचे दर काहीसे वधारले तरी चांदीत तीन हजार तर सोन्यात २०० रुपयांची घसरण झाली.

Web Title: Silver plunged by Rs 3,000, gold fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.