Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदीची झेप ५४ हजारांवर, सोन्याच्याही दरात वाढ!

चांदीची झेप ५४ हजारांवर, सोन्याच्याही दरात वाढ!

अमेरिकन बँकांसह विदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 02:19 AM2020-07-15T02:19:44+5:302020-07-15T02:20:41+5:30

अमेरिकन बँकांसह विदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे.

Silver jumps to Rs 54,000, gold price also rises! | चांदीची झेप ५४ हजारांवर, सोन्याच्याही दरात वाढ!

चांदीची झेप ५४ हजारांवर, सोन्याच्याही दरात वाढ!

जळगाव : सोने-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ सुरूच असून, सुवर्णनगरी जळगावात सात दिवसांच्या लॉकडाऊनपूर्वी गेल्या सप्ताहाच्या तुलनेत मंगळवारी (दि. १४) चांदीच्या दरात ३,५०० रु पयांनी वाढ होऊन ती ५४ हजार रु पये प्रतिकिलोवर पोहोचली. तर सोन्याच्याही दरात गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ८०० रु पयांनी वाढ होऊन ते पुन्हा ५० हजार रुपये प्रतितोळा झाले.
अमेरिकन बँकांसह विदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. जळगावात ७ ते १३ जुलैदरम्यान कडक लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनपूर्वी सोने ४९,२०० रुपये प्रतितोळा होते. चांदी ५०,५०० रुपयांवर होती. दि. १४ रोजी सुवर्णपेढ्या सुरू होताच सोन्याचे दर गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ८०० रु पयांनी वाढून ५० हजार रु पये प्रतितोळा झाले. तर चांदीचे दर ३,५०० रु पयांनी वाढ होऊन ५४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. जागतिक स्थिती पाहता भविष्यात मौल्यवान धातुंमध्ये गुंतवणूक वाढणार असल्याने त्याचे दर वाढत राहणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

जागतिक घडामोडींचा परिणाम होऊन सोने-चांदीची दरवाढ होत आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यात वाढ कायम राहील.
- स्वरु प लुंकड, सचिव,
जळगाव शहर सराफ असोसिएशन

Web Title: Silver jumps to Rs 54,000, gold price also rises!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.