Lokmat Money > बिझनेस न्यूज > म्युच्युअल फंडात गुंतवावे का, थेट शेअर बाजारात उतरावे?

म्युच्युअल फंडात गुंतवावे का, थेट शेअर बाजारात उतरावे?

थेट शेअर बाजाराचे ज्ञान नसल्याने अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीमार्फत रक्कम गुंतवीत असतात.  ज्यांना शेअर बाजाराची माहिती आणि ज्ञान आहे ते थेट बाजारात गुंतवणूक अथवा ट्रेड करीत असतात. 

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 27, 2021 07:30 AM2021-12-27T07:30:16+5:302021-12-27T07:30:56+5:30

थेट शेअर बाजाराचे ज्ञान नसल्याने अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीमार्फत रक्कम गुंतवीत असतात.  ज्यांना शेअर बाजाराची माहिती आणि ज्ञान आहे ते थेट बाजारात गुंतवणूक अथवा ट्रेड करीत असतात. 

Should I invest in a mutual fund, go directly to the stock market? | म्युच्युअल फंडात गुंतवावे का, थेट शेअर बाजारात उतरावे?

म्युच्युअल फंडात गुंतवावे का, थेट शेअर बाजारात उतरावे?

- पुष्कर कुलकर्णी  

फायनान्शिअल फ्रीडम म्हणजेच भविष्यातील आर्थिक सुनिश्चिततामध्ये म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारमधील गुंतवणूक हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या बचतीचा काही हिस्सा हा म्युच्युअल फंड आणि काही रक्कम शेअर बाजारात गुंतविल्यास भविष्यात आकर्षक परतावा मिळू शकतो. आपली बचत भविष्यात वाढावी असे सर्वांना वाटत असते. थेट शेअर बाजाराचे ज्ञान नसल्याने अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीमार्फत रक्कम गुंतवीत असतात.  ज्यांना शेअर बाजाराची माहिती आणि ज्ञान आहे ते थेट बाजारात गुंतवणूक अथवा ट्रेड करीत असतात. 

थेट शेअर बाजारात उतरताना... 
शेअर बाजारात दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात. एक ट्रेडर्स आणि दुसरा दीर्घकालीन गुंतवणूकदार. ट्रेडर्स इंट्रा डे आणि ऑप्शन या माध्यमातून ट्रेडिंग करतात तर दीर्घकालीन गुंतवणूकदार विविध कंपन्यांचे शेअर्स निवडून विकत घेतात आणि दीर्घकालीन ठेवतात. आपण यातील एक किंवा दोनही प्रकारात राहू शकतो. 

म्युच्युअल फंड मधून आपली रक्कम नेमकी कशी वाढते?
आपण जो फंड प्रकार निवडतो त्यात आपली रक्कम त्या म्युच्युअल फंडात गुंतविली जाते. मार्केटवर आधारित रिटर्न्स लक्षात घेता आपण निवडलेल्या फंडची एनएव्ही (नेट असेट व्हॅल्यू ) निर्धारित होत असते. जसजशी ही एनएव्ही वाढत जाते तसतशी आपली गुंतवणूक वृद्धिंगत होत असते. 

म्युच्युअल फंड निवडताना...
बाजारातील चढउतारावर एनएव्ही वर-खाली होत असते. गुंतवणुकीचा कालावधी जितका अधिक तितकी गुंतवणूक वाढीसाठी संधी अधिक हे सर्वसाधारण म्युच्युअल फंडचे तत्त्व असते. बॅलन्स आणि इक्विटी या दोन प्रकारातील नेमका फंड कोणता निवडावा यासाठी तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागार यांचे मार्गदर्शन घेणे उचित ठरते. तसेच एका फंडमधून दुसऱ्या फंडातही आपली रक्कम हस्तांतरित करता येऊ शकते.

ट्रेडिंग करताना कोणती काळजी घ्यावी?
जसा फायदा तसाच तोटाही होतो. तो सहन करण्याची क्षमता असावी. 
आवश्यक खेळते भांडवल असणे जरुरी. 
शेअर बाजाराचा तांत्रिक अभ्यास असणे अत्यंत आवश्यक. 
बाजाराचा कल आणि दिशा व्यवस्थित समजणे आवश्यक.  
बाजारावर मिनिटामिनिटाला नजर असणे आवश्यक 
स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करणे आवश्यक.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी
- शेअर बाजारातील फंडामेंटल्सचा अभ्यास असणे आवश्यक.
- ज्या शेअर्स मध्ये रक्कम गुंतवली आहे त्या कंपनीची उलाढाल, फायदा तोटा तसेच भविष्यातील संधी याचा बारकाईने अभ्यास आवश्यक.
- वेळ प्रसंगी तोटा सहन करून दुसऱ्या शेअर्स मध्ये रक्कम वळविता येण्याचे निर्णय कौशल्य आवश्यक.
- जितकी रक्कम वर्तमानात आवश्यक नाही तितकीच शेअर बाजारात गुंतविणे हिताचे असते याचे भान आवश्यक. 
- सातत्य, धैर्य आणि निर्णय संतुलन हे गुण आवश्यक. 

- अभ्यासपूर्ण दीर्घ कालावधीसाठी शेअर बाजारात थेट उतरणे फायद्याचे राहू शकते. परंतु शेअर बाजाराशी निगडित काही महत्वाच्या कन्सेप्ट्स शिकूनच ... त्यासाठी नियमित वाचत राहा अर्थ-नीति.

Web Title: Should I invest in a mutual fund, go directly to the stock market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.