Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Closing Bell: शेअर बाजार आपटला; २ महिन्यांत पहिल्यांदाच सेन्सेक्स ५९ हजारांच्या खाली, Nifty मध्येही घसरण

Share Market Closing Bell: शेअर बाजार आपटला; २ महिन्यांत पहिल्यांदाच सेन्सेक्स ५९ हजारांच्या खाली, Nifty मध्येही घसरण

Share Market : सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचेही शेअर्स चार टक्क्यांपर्यंत घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 04:08 PM2021-11-22T16:08:08+5:302021-11-22T16:08:33+5:30

Share Market : सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचेही शेअर्स चार टक्क्यांपर्यंत घसरले.

Share Market LIVE Sensex ends 1170 pts lower amid deep sell off Nifty closes at 17416 Paytm dives 13 percent | Share Market Closing Bell: शेअर बाजार आपटला; २ महिन्यांत पहिल्यांदाच सेन्सेक्स ५९ हजारांच्या खाली, Nifty मध्येही घसरण

Share Market Closing Bell: शेअर बाजार आपटला; २ महिन्यांत पहिल्यांदाच सेन्सेक्स ५९ हजारांच्या खाली, Nifty मध्येही घसरण

Share Market BSE Sensex, Nifty50: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसू आली. पहिल्याच दिवशी इक्विटी मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात विक्रीमुळे दोन्ही बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही जवळपास २ टक्क्यांची घसरण होऊन बंद झाले. रिलायन्स (Reliance) सारखे हेवीवेट स्टॉक्स आणि बँकिंग, आयटी, रियल्टी, मेटल शेअर्समध्ये सुरू झालेल्या विक्रीचा मार्कटवर परिणाम दिसून आला. सेन्सेक्सवर केवळ चार आणि निफ्टी ५०वर ९ स्टॉक्समध्ये केवळ खरेदी दिसून आली. या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स ११७०.१२ अंकांनी घसरून ५८,४६५.८९ वर आणि निफ्टी ४८.२५ अंकांच्या घसरणीसह १७,४१६.५५ अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्सवर आज इंडसइंड बँक सोडून अन्य बँकांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टीच्या सर्व सेक्टर्सचे इंडेक्ट घसरणीसह बंद झाले. सर्वाधिक घसरण ही निफ्टी रियल्टीमध्ये दिसून आली आणि तो ४.१४ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी बँक आज २.२३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. तर दुसरीकडे रिलायन्सच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांपेक्षा अधिक आणि बजाज फायनॅन्सच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांची घसरण दिसून आली.

कामकाजादरम्यान एनएसई निफ्टी ५० इंडेक्स १७,५०० च्या खाली गेला. निफ्टीमध्ये गेल्या सहा महिन्यांतील मोठं करेक्शन पाहायला मिळालं. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं सौदी अरेबियाची कंपनी सऊदी अरामकोला आपली रिफायनसी आणि पेट्रोरसायन व्यवसायातील २० टक्के हिस्सा विकण्याच्या व्यवहाराचं पूनर्मूल्यांकन करण्याची घोषणा केली. त्यानंतर आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ४.१४ टक्क्यांच्या घसरणीसह २३७०.५० रूपयांवर पोहोचला. 

Web Title: Share Market LIVE Sensex ends 1170 pts lower amid deep sell off Nifty closes at 17416 Paytm dives 13 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.