lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI WECARE: खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के अधिक व्याज; मार्च 2022 पर्यंत गुंतवणुकीची संधी

SBI WECARE: खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के अधिक व्याज; मार्च 2022 पर्यंत गुंतवणुकीची संधी

SBI Wecare Deposit Scheme : ही योजना सप्टेंबर 2021 मध्ये संपणार होती, जी आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बँकेने या योजनेचा कालावधी पाचव्यांदा वाढवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:07 PM2021-10-14T17:07:58+5:302021-10-14T17:10:03+5:30

SBI Wecare Deposit Scheme : ही योजना सप्टेंबर 2021 मध्ये संपणार होती, जी आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बँकेने या योजनेचा कालावधी पाचव्यांदा वाढवला आहे.

SBI Wecare Deposit Scheme Senior Citizens can get more return of Fixed Deposits | SBI WECARE: खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के अधिक व्याज; मार्च 2022 पर्यंत गुंतवणुकीची संधी

SBI WECARE: खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के अधिक व्याज; मार्च 2022 पर्यंत गुंतवणुकीची संधी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना संकट काळात मे 2020 मध्ये विशेष मुदत ठेव (Fixed Deposit) योजना सुरू केली. या अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) अतिरिक्त 0.30 टक्के व्याज दिले जाते. या योजनेचे नाव आहे, SBI WECARE Deposit Scheme. ही योजना सप्टेंबर 2021 मध्ये संपणार होती, जी आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बँकेने या योजनेचा कालावधी पाचव्यांदा वाढवला आहे. (SBI Wecare Deposit Scheme Senior Citizens can get more return of Fixed Deposits)

5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त ठेवींवर मिळेल फायदा
SBI WECARE Deposit Scheme अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त किरकोळ मुदत ठेवींसाठी (Retail Term Deposit) लागू असलेल्या व्याज दरापेक्षा 0.30 टक्के अतिरिक्त व्याज दर दिला जातो. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ज्येष्ठ नागरिक SBI WECARE Deposit Scheme मध्ये गुंतवणूक करून सामान्यपेक्षा 0.80 टक्के अधिक व्याज मिळवू शकतात.  दरम्यान, एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50 टक्के अधिक व्याज देते. बँक सध्या 5 वर्षांच्या ठेवींवर 5.40 टक्के व्याज देत आहे.

2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर मिळतील व्याजदर
एसबीआय सामान्यत: ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 5.90 टक्के वार्षिक व्याज देते. आता जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने SBI WECARE Deposit Scheme मध्ये एफडी केली असेल तर त्याला 0.30 टक्के अतिरिक्त व्याज (Additional Interest) मिळेल. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांच्या एफडीवर 6.20 टक्के वार्षिक व्याज मिळेल. हे दर 8 जानेवारी 2021 पासून लागू आहेत. हे व्याज दर किरकोळ मुदत ठेवींवर म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू आहेत.

कधी मिळणार नाही अतिरिक्त व्याजाचा लाभ
एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, SBI WECARE Deposit Scheme अंतर्गत प्राप्त अतिरिक्त व्याजाचा लाभ नवीन खाते आणि नूतनीकरणावर उपलब्ध होईल. यामध्ये एक अट देखील आहे की, जर तुम्ही मॅच्युरिटी आधी रक्कम काढली (Pre-Maturity Withdrawal) तर तुम्हाला अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार नाही. एवढेच नाही तर तुम्हाला 0.50 टक्क्यांपर्यंत दंड (Penalty)देखील भरावा लागू शकतो.

SBI WECARE Deposit Scheme साठी व्याजदर
- योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7-45 दिवसांच्या ठेवींवर 3.4 टक्के व्याज मिळेल.
- याशिवाय 46-179 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.4 टक्के व्याज दर लागू आहे.
- एसबीआय 180-210 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.9 टक्के व्याज मिळेल.
- 211 दिवसांपासून 1 वर्षापर्यंतच्या ठेवींवर 4.9 टक्के व्याज मिळेल.
- 1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर 5.5 टक्के व्याज दिले जाईल.
- स्टेट बँक 2 वर्षांपासून 3 वर्षांपेक्षा कमी ठेवींवर 5.6 टक्के व्याज देत आहे.
- या व्यतिरिक्त, 3 वर्षांपासून 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 5.8 टक्के व्याज दर आहे.
- 5 ते 10 वर्षांच्या ठेवींवर 6.20 टक्के सर्वाधिक व्याज मिळेल.

Web Title: SBI Wecare Deposit Scheme Senior Citizens can get more return of Fixed Deposits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.