Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक ग्राहकांनो लक्ष द्या! चुकूनही 'या' गोष्टी करू नका, अन्यथा...; SBI चा इशारा

बँक ग्राहकांनो लक्ष द्या! चुकूनही 'या' गोष्टी करू नका, अन्यथा...; SBI चा इशारा

sbi : बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे किंवा मेसेजिंगद्वारे ४० कोटीहून अधिक ग्राहकांना सावध करत यापासून वाचण्याचे मार्ग सुचवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:49 PM2021-02-06T15:49:06+5:302021-02-06T15:49:52+5:30

sbi : बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे किंवा मेसेजिंगद्वारे ४० कोटीहून अधिक ग्राहकांना सावध करत यापासून वाचण्याचे मार्ग सुचवले आहेत.

sbi customers are requested to be alert for 40 crore users digital frauds cyber frauds and online frauds | बँक ग्राहकांनो लक्ष द्या! चुकूनही 'या' गोष्टी करू नका, अन्यथा...; SBI चा इशारा

बँक ग्राहकांनो लक्ष द्या! चुकूनही 'या' गोष्टी करू नका, अन्यथा...; SBI चा इशारा

Highlightsजर कोणत्याही प्रकारे सायबर क्राइम झालाच तर सरकारच्या राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकतात.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना आर्थिक फसवणूक होईल, असे कोणतेही काम न करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संकट काळापासून देशात ऑनलाईन फसवणूक व सायबर क्राइमची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी सध्या बँक आणि सरकार अ‍ॅलर्ट जारी करत आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे किंवा मेसेजिंगद्वारे ४० कोटीहून अधिक ग्राहकांना सावध करत यापासून वाचण्याचे मार्ग सुचवले आहेत.

कोणतीही बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संपूर्ण गुप्ततेने एटीएमद्वारे व्यवहार करावा. एटीएममधून रोख रक्कम काढणे सोपे आणि सोयीचे आहे, मात्र, यासंबंधित फसवणुकीच्या बातम्याही वेळोवेळी येत असतात. अशा परिस्थितीत डेबिट किंवा एटीएम कार्ड सुरक्षित पद्धतीने वापरणे आणि एटीएममधून व्यवहार करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे एसबीआयने आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे.

ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या...
-  तुमच्या मोबाईल फोन कधीही अनलॉक ठेवू नका.
- वापरात नसलेले अॅप्लिकेशन आणि कनेक्शन ओपन ठेवू नका.
- माहीत नसलेले आणि असुरक्षित नेटवर्कला तुमचा मोबाईल कनेक्ट करू नका.
- संवेदनशील सूचना जसे की, पासवर्ड, युजर नेम तुमच्या मोबाईलमध्ये लिहून ठेवू नका.
- व्हायरस असलेला डेटा कोणत्याही इतर मोबाईलमध्ये ट्रान्सफर करू नका.

फसवणूक झालीच तर हे काम करा...
जर कोणत्याही प्रकारे सायबर क्राइम झालाच तर सरकारच्या राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय, फसवणुकीचा पूर्ण रिपोर्ट किंवा घटनेचा तपशील स्थानिक पोलीस अधिकारी किंवा जवळील एसबीआय शाखेत त्वरित कळविला जाऊ शकतो, असेही एसबीआयने ग्राहकांना सांगितले आहे.
 

Web Title: sbi customers are requested to be alert for 40 crore users digital frauds cyber frauds and online frauds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.