Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेकडून आलेल्या 'या' मेसेजकडे लक्ष द्या नाहीतर...

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेकडून आलेल्या 'या' मेसेजकडे लक्ष द्या नाहीतर...

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 01:07 PM2021-10-30T13:07:31+5:302021-10-30T13:08:37+5:30

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे

sbi alert this message coming from bank know what to do | SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेकडून आलेल्या 'या' मेसेजकडे लक्ष द्या नाहीतर...

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेकडून आलेल्या 'या' मेसेजकडे लक्ष द्या नाहीतर...

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) जर तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बँकेने आपल्या सर्व ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँक नियमितपणे त्यांच्या ग्राहकांना फिशिंग, हॅकिंग किंवा फसवणुकीसारख्या प्रकारापासून वाचवण्यासाठी त्यांच्याशी सिक्युरिटी अपडेटस शेअर करते. गेल्या काही दिवसांत फसवणुकीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये संवेदनशील माहितीच्या माध्यमातून बँक ग्राहकांची फसवणूक केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. 

सर्व बँका नियमितपणे त्यांच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी मेसेज पाठवतात. ग्राहकांना आलेले मेसेज बँकेनेच पाठवले आहेत की नाही यासाठी SBI ने काही टिप्स शेअर केल्या आहेत. एसबीआयने यासंदर्भात आपल्या ट्विटरल अकाऊंटवरून ट्विट करुन माहिती दिली आहे. SBI ग्राहकांनी नेहमी SBI/SB ने सुरू होणारे शॉर्टकोड तपासावेत, उदाहरणार्थ SBIBNK, SBIINB, SBIPSG आणि SBINO. बँकेने आपल्या खातेधारकांना सतर्क केले की अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या मेसेजवर कोणताही रिप्लाय देऊ नये.

एसबीआय बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी दररोज अलर्ट जारी करत असते. SBI चा उद्देश ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा आहे. बँक आपल्या ट्विटर हँडल आणि एमएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवत असते. SBI ने कस्टमर केअर नंबर देखील जारी केला आहे. तुम्ही ग्राहक सेवा क्रमांक 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 वर संपर्क साधून बँकेशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोट्यवधी ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी SBI चं मोठं पाऊल; ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

एसबीआयने आपल्या ग्राहकांना सुरक्षित बँकिंग सुविधा देण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये लाँच केली आहेत. जेणेकरुन आर्थिक गरजांसोबतच सुरक्षिततेची काळजी घेतली जाऊ शकते. कोट्यवधी ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने ओटीपी आधारित व्यवहार (SBI ATM New Rule) सादर केला आहे. या नवीन प्रणालीच्या वापरात, ग्राहक केवळ ओटीपीच्या आधारे एटीएममधून पैसे काढू शकतील. ग्राहकांना प्रथम त्यांच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी मिळेल. ज्याच्या आधारे एटीएममधून पैसे काढता येतील. त्यामुळे फसवणूक टाळण्यास मदत होईल. एटीएम क्लोनिंग किंवा इतर फसवणूक टाळली जाईल कारण ओटीपीशिवाय रोख व्यवहार होणार नाहीत.
 

Read in English

Web Title: sbi alert this message coming from bank know what to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.