Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावित्री जिंदल ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला; ‘फाेर्ब्स’च्या यादीत सहावं स्थान

सावित्री जिंदल ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला; ‘फाेर्ब्स’च्या यादीत सहावं स्थान

Top 1 Rich women in India: वर्षभरात ९ लाख काेटींनी वाढली मालमत्ता, यामध्ये हॅवेल्स इंडियाच्या विनोद राय गुप्ता, युएसव्ही प्रायव्हेट लि.च्या लीना तिवारी, बायजूच्या दिव्या गोकुलनाथ, बायोकाॅनच्या किरण मजूमदार शाॅ आणि टाफेच्या मल्लिका श्रीनिवासन यांचा समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 06:15 AM2021-10-09T06:15:58+5:302021-10-09T06:16:26+5:30

Top 1 Rich women in India: वर्षभरात ९ लाख काेटींनी वाढली मालमत्ता, यामध्ये हॅवेल्स इंडियाच्या विनोद राय गुप्ता, युएसव्ही प्रायव्हेट लि.च्या लीना तिवारी, बायजूच्या दिव्या गोकुलनाथ, बायोकाॅनच्या किरण मजूमदार शाॅ आणि टाफेच्या मल्लिका श्रीनिवासन यांचा समावेश आहे.

Savitri Jindal became the richest woman in India; Sixth on the Forbes list | सावित्री जिंदल ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला; ‘फाेर्ब्स’च्या यादीत सहावं स्थान

सावित्री जिंदल ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला; ‘फाेर्ब्स’च्या यादीत सहावं स्थान

नवी दिल्ली : ‘फाेर्ब्स’ नियतकालिकाने सर्वाधिक श्रीमंतांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. रिलायन्स उद्याेगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सलग १४ व्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या यादीत ६ महिला उद्याेजकांनी स्थान मिळविले आहे. ओ. पी. जिंदल समूहाच्या सावित्री जिंदल या देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या आहेत. टाॅप १०० यादीत सहा महिलांना स्थान मिळाले आहे.

यामध्ये हॅवेल्स इंडियाच्या विनोद राय गुप्ता, युएसव्ही प्रायव्हेट लि.च्या लीना तिवारी, बायजूच्या दिव्या गोकुलनाथ, बायोकाॅनच्या किरण मजूमदार शाॅ आणि टाफेच्या मल्लिका श्रीनिवासन यांचा समावेश आहे.

सावित्री जिंदल
७१ वर्षीय सावित्री जिंदल या भारतातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी आहेत. ‘फाेर्ब्स’च्या माहितीनुसार त्यांच्याकडे १३.४६ लाख काेटी रुपयांची मालमत्ता आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत सुमारे ९.७२ लाख काेटी रुपयांची वाढ झाली आहे. 

विनाेद राय गुप्ता
हॅवेल्स इंडियाच्या विनाेद राय गुप्ता यांचे श्रीमंतांच्या यादीत २४ वे स्थान आहे. मात्र, ७६ वर्षीय गुप्ता या देशातील दुसऱ्या सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांच्याकडे एकूण ५.६८ लाख काेटी रुपयांची मालमत्ता आहे. गेल्या वर्षभरात त्यांची संपत्ती दुप्पटीने वाढली आहे.

लीना तिवारी
यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या ४३ वर्षीय लीना तिवारी यांचे श्रीमंत महिलांच्या यादीत तिसरे स्थान आहे. त्यांच्याकडे ३.२८ लाख काेटी रुपयांची मालमत्ता आहे. यूएसव्ही ही औषध निर्मिती आणि बायाेतंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. श्रीमंतांच्या यादीत त्यांचे ४३ वे स्थान आहे.

दिव्या गाेकुलनाथ
बायजू या ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या कंपनीच्या सह-संस्थापिका ३५ वर्षीय दिव्या गाेकुलनाथ या श्रीमंतांच्या यादीत ४७ व्या स्थानी आहेत. मात्र, महिलांच्या यादीत त्यांचे स्थान चाैथे आहे. त्यांच्याकडे सुमारे ३.०२ लाख काेटी रुपयांची मालमत्ता आहे.

किरण मजूमदार शाॅ
बायाेकाॅनच्या किरण मजूमदार शाॅ या श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे २.९१ लाख काेटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या वर्षभरात त्यांची संपत्ती सुमारे ५१ हजार काेटी रुपयांनी घटली आहे. त्यामुळे यादीतही त्यांचे स्थान घसरले आहे. 

मल्लिका श्रीनिवासन
ट्रॅक्टर्स ॲण्ड फार्म इक्विपमेंट लिमिटेडची (टाफे) मालकी असलेल्या संयुक्त कुटुंबातील मल्लिका श्रीनिवासन यांना श्रीमंत महिलांमध्ये सहावे स्थान मिळाले आहे. त्यांच्याकडे २.१९ लाख काेटी रुपयांची संपत्ती आहे. एकूण श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांचे ७३ वे स्थान आहे.

Web Title: Savitri Jindal became the richest woman in India; Sixth on the Forbes list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.