Gold Silver Rate Today 9 December: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. चांदी आज तब्बल २०३४ रुपयांनी स्वस्त होऊन १७७०५४ रुपये प्रति किलो वर उघडली आणि जीएसटीसह याची किंमत १८२३६५ रुपये प्रति किलो झाली. सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा जीएसटी वगळता चांदीचा भाव १७९०८८ रुपये प्रति किलो होता आणि सोन्याचा भाव जीएसटी वगळता १२८२५७ रुपये प्रति १० ग्रॅम होता.
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १२७४०९ रुपयांवर उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १३१२३१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव आज जीएसटीसह १२०२०८ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९८४२३ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे.
सोन्याचा आजचा भाव १७ ऑक्टोबरच्या ऑल टाईम हाय (१३०८७४ रुपये) पेक्षा ३४६५ रुपये कमी राहिला आहे, तर चांदीचा भाव ८ डिसेंबरच्या ऑल टाईम हाय (१७९१०० रुपये किलो) पेक्षा २०४६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरा संध्याकाळी ५ च्या आसपास दर जाहीर केले जातात.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ८४४ रुपयांनी घसरून १२६८९९ रुपये प्रति १० ग्रॅम वर उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १३०७०५ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्ज जोडलेला नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ७७६ रुपयांनी कमी होऊन ११६७०७ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली आहे. जीएसटीसह हा भाव १२०२०८ रुपये झालाय.
१८ कॅरेट सोन्याचा भाव ६३६ रुपयांच्या घसरणीसह ९५५५७ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आणि जीएसटीसह याची किंमत ९८४२३ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
१४ कॅरेट सोन्याचा दरही ४९६ रुपयांनी कमी झाला आहे. आज हा दर ७४५३४ रुपयांवर उघडला आणि जीएसटीसह तो ७६७७० रुपयांवर पोहोचला.
