Lokmat Money > बिझनेस न्यूज > "व्होडाफोन आयडियाला सरकारने जिवंत ठेवावे"

"व्होडाफोन आयडियाला सरकारने जिवंत ठेवावे"

सज्जन जिंदाल यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 02:10 AM2020-08-12T02:10:01+5:302020-08-12T02:10:20+5:30

सज्जन जिंदाल यांचे आवाहन

Sajjan Jindal asks government to ensure Vodafone Idea survives | "व्होडाफोन आयडियाला सरकारने जिवंत ठेवावे"

"व्होडाफोन आयडियाला सरकारने जिवंत ठेवावे"

कोलकाता : जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी केंद्र सरकारला व्होडाफोनआयडिया जिवंत राहील याची काळजी घेण्याचे आवाहन केले. अस्तित्वासाठी संघर्ष करीत असलेल्या या दूरसंचार कंपन्या बंद पडल्या तर संपूर्ण भारतातील मोबाईल फोन वापरकर्ते त्यात भरडून निघतील आणि आज तीन खासगी कंपन्यांच्या बाजारामुळे दूरसंचार क्षेत्र फक्त दोनच कंपन्यांपुरते मर्यादित राहील, असा इशारा दिला.

‘‘सरकारने बाजारात तिसरा स्पर्धक टिकून राहण्यासाठी कोणत्या तरी मार्गाने व्होडाफोनआयडियाला (व्हीआयएल) अस्तित्वात ठेवले पाहिजे. जर व्हीआयएल बंद पडले तर बाजारात फक्त दोनच स्पर्धक राहतील व त्यामुळे ग्राहकांना तोटा होईल,’’ असे जिंदाल यांनी शुक्रवारी टिष्ट्वटरवर म्हटले.
व्हीआयएलचा तोटा जूनच्या तिमाहीत २५,४६० कोटी रूपये झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिंदाल यांनी हे आवाहन केले. कंपनीला तोटा होण्याचा हा तिमाहीचा सलग आठवा प्रसंग होता. वैधानिक एजीआर ड्यूशी संबंधित वन टाईम चार्ज आणि सतत ग्राहक दूर जाणे यामुळे हा तोटा
झाला.

Web Title: Sajjan Jindal asks government to ensure Vodafone Idea survives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.