Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vodafone-Idea युझर्ससाठी १०९ रुपयांचा प्लॅन रिलाँच; पाहा आता कोणते मिळतायत बेनिफिट्स

Vodafone-Idea युझर्ससाठी १०९ रुपयांचा प्लॅन रिलाँच; पाहा आता कोणते मिळतायत बेनिफिट्स

यापूर्वी कंपनीनं छोट्या कालावधीसाठी हा प्लॅन लाँच केला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 09:33 PM2021-04-24T21:33:55+5:302021-04-24T21:35:27+5:30

यापूर्वी कंपनीनं छोट्या कालावधीसाठी हा प्लॅन लाँच केला होता. 

Rupees 109 plan relaunch for Vodafone Idea users See what benefits you get now | Vodafone-Idea युझर्ससाठी १०९ रुपयांचा प्लॅन रिलाँच; पाहा आता कोणते मिळतायत बेनिफिट्स

Vodafone-Idea युझर्ससाठी १०९ रुपयांचा प्लॅन रिलाँच; पाहा आता कोणते मिळतायत बेनिफिट्स

Highlightsयापूर्वी कंपनीनं छोट्या कालावधीसाठी हा प्लॅन लाँच केला होता. व्होडाफोन आयडिया मर्जरनंतर कंपनीनं हा प्लॅन केला होता बंद.

Vodafone-Idea कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या कंपनीनं भारतात १०९ रुपयांचा आपला पॉप्युलर प्लॅन पुन्हा एकदा रोलआऊट केला आहे. Vodafone-Idea चा हा प्लॅन अतिशय स्वस्त आणि अधिक बेनिफिट्स देणारा प्लॅन आहे. यापूर्वी हा प्लॅन काही कालावधीसाठी लाँच करण्यात आला होता. परंतु दोन्ही कंपन्यांच्या मर्जरनंतर हा प्लॅन बंद करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा एकदा कंपनीनं हा प्लॅन लाँच केला आहे. 

Vodafone-Idea चा १०९ रुपयांचा प्लॅन २० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. तसंच यात दररोज १ जीबी डेटा देण्यात येतो. याचाच अर्थ ग्राहकांना २० दिवसांसाठी तब्बल २० जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३०० एसएमएसही देण्यात येतात. तसंच याशिवाय सर्व नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा देण्यात येते. 

आणखी एक जबरदस्त प्लॅन

Vodafone-Idea सध्या आपल्या ग्राहकांना आणखी एक जबरदस्त प्लॅन ऑफर करत आहे. १४९ रूपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज ३ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. तसंच या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असून ग्राहकांना दररोज ३०० एमबी डेटाही देण्यात येतो. हा प्रीपेड प्लॅड Vodafone-Idea च्या अॅपवरून रिचार्ज केल्यास ग्राहकांना १ जीबी अतिरिक्त डेटा देण्यात येतो. तर अन्य बेनिफिट्सबद्दल सांगायचं झालं तर यात Vi Movies आणि Vi TV चा अॅक्सेसही मिळतो. 
 

Web Title: Rupees 109 plan relaunch for Vodafone Idea users See what benefits you get now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.