lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Royal Enfield : हौसेचं 'मोल' वाढलं... रॉयल एन्फिल्ड बुलेटच्या किंमतीत जानेवारीपासून वाढ

Royal Enfield : हौसेचं 'मोल' वाढलं... रॉयल एन्फिल्ड बुलेटच्या किंमतीत जानेवारीपासून वाढ

Royal Enfield : क्लासिक 350, Meteor 350 आणि हिमालयीन मोटारसायकल या बुलेट गाड्यांचा समावेश आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 07:51 PM2022-01-11T19:51:59+5:302022-01-11T19:53:21+5:30

Royal Enfield : क्लासिक 350, Meteor 350 आणि हिमालयीन मोटारसायकल या बुलेट गाड्यांचा समावेश आहे. 

Royal Enfield : Hausa price rises ... Royal Enfield Bullet price rises from January | Royal Enfield : हौसेचं 'मोल' वाढलं... रॉयल एन्फिल्ड बुलेटच्या किंमतीत जानेवारीपासून वाढ

Royal Enfield : हौसेचं 'मोल' वाढलं... रॉयल एन्फिल्ड बुलेटच्या किंमतीत जानेवारीपासून वाढ

मुंबई, पुण्यासह आता ग्रामीण भागातील तरुणांमध्येही रॉयल एन्फिल्ड गाडीची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळेच, या गाड्यांची मागणी वाढत आहे. मात्र, रॉयल एन्फिल्डची हौसेनं खरेदी करणाऱ्यांना शॉक देणारी बातमी आहे. कारण, जानेवारी महिन्यांपासून कंपनीने आपल्या काही मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामध्ये, क्लासिक 350, Meteor 350 आणि हिमालयीन मोटारसायकल या बुलेट गाड्यांचा समावेश आहे. 

क्लासीक 350

वाढविण्यात आलेली किंमत - 2,872 रुपयांपासून ते 3,332 रुपये 
एंट्री लेवल, Redditch Classic 350 -  1.87 लाख (एक्स-शोरूम)
टॉप मॉडेल, Chrome Classic 350-  2.18 लाख (एक्स-शोरूम)
क्लासिक 350 रॉयल एनफील्ड सेगमेंटची सर्वाधिक संख्येनं विकणारी मोटारसायकल आहे. कंपनीने ही पॉप्युलॅरिटीला ध्यानात घेऊनच किंमतीत वाढ केली आहे. क्लासिक 350 रेंजच्या बाइक्सची किंमत वेरिएंटनुसार वाढविण्यात आली आहे. 

रॉयल एन्फिल्ड Meteor 350

वाढविण्यात आलेली किंमत - फायरबॉल रेंज 2,511 रुपये
फायरबॉल रेंज- 2.01 लाख ते 2.03 लाख (एक्स-शोरुम) पर्यंत
Meteor 350 ची स्टेलर रेंज
वाढवलेल किंमत - 2601
नवी किंमत - 2.07 लाख रुपये ते 2.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) 
 
Meteor 350 Supernova सर्वाधिक वाढ 

वाढविण्यात आलेली किंमत - 2,752 रुपये
नवीन किंमत - 2.17 लाख से लेकर 2.19 लाख (एक्स-शोरूम) 
Meteor 350 लाइनअप चे Supernova मॉडेलवर सर्वाधिक वाढ झालीय, या सर्व वेरिएंटवर 2,752 रुपए वाढ झालीय.

रॉयल एनफील्ड हिमालयन

रॉयल एनफील्ड की हिमालयन रेंजमध्ये सर्वाधिक किंमत वाढल्याचे दिसून आले. 

वाढलेली किंमत - 4,000 रुपयांपेक्षा जास्त 
नवीन किंमत - रॉयल एनफील्ड हिमालयन ग्रे आणि सिल्वर- 2.14 लाख (एक्स-शोरूम)
रॉयल एनफील्ड हिमालयन ब्लॅक आणि ग्रीन- 2.22 लाख (एक्स-शोरूम)
रॉयल एनफील्डच्या इन बाइक्स की किंमत पूर्वीएवढीच. 
 

Web Title: Royal Enfield : Hausa price rises ... Royal Enfield Bullet price rises from January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.