Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्राहकांना लुटणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने लावला चाप

ग्राहकांना लुटणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने लावला चाप

ब-याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झॅक्शन फेल होतात. पण याची नोंद फ्री ट्रान्झॅक्शनमध्ये करण्यात आल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 03:20 AM2019-08-16T03:20:40+5:302019-08-16T03:23:00+5:30

ब-याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झॅक्शन फेल होतात. पण याची नोंद फ्री ट्रान्झॅक्शनमध्ये करण्यात आल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत होता.

Reserve Bank puts pressure on banks for free Transaction ATM | ग्राहकांना लुटणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने लावला चाप

ग्राहकांना लुटणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने लावला चाप

नवी दिल्ली : ब-याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झॅक्शन फेल होतात. पण याची नोंद फ्री ट्रान्झॅक्शनमध्ये करण्यात आल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत होता. त्यामुळे बँका ग्राहकाकडून शुल्क आकारत होत्या. पण
असे व्यवहार फ्री ट्रान्झॅक्शन म्हणून ग्राह्य धरू नये, असे परिपत्रक रिझर्व्ह बँकेने बुधवारी काढले आहे. त्यामुळे ग्राहकांना लुटणाºया बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे.

आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रान्झॅक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे. बँकांकडून महिन्याला केवळ ५ ट्रान्झॅक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला २० ते २५ रुपयांचे शुल्क आकारले जात होते. पण अनेकदा खात्यातील शिल्लक ठेव, पासवर्ड बदलण्यासाठी एटीएममध्ये जातो. ही ट्रान्झॅक्शनही या पाच मोफत ट्रान्झॅक्शनमध्ये बँका पकडत होत्या. यामुळे जर पाचनंतरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही खात्यातील शिल्लक तपासायला गेला तरीही शुल्क कापले जात होते. यामुळे रिझर्व्ह बँकेकडे वाढलेल्या तक्रारींमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. (वृत्तसंस्था)

कशी कराल तक्रार?
रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाइटवर तक्रार व्यवस्थापन यंत्रणा सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील सर्व बँका आणि वित्तीय संस्था यांच्या विरोधातील तक्रारी या यंत्रणेवर केल्या जाऊ शकतील. वेबसाइटवर तक्रारीचा तपशील दाखल केल्यानंतर ती तक्रार योग्य लोकपालाकडे अथवा रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयाकडे पाठविली जाईल. तेथे या तक्रारीचा निपटारा केला जाईल. या सुविधेमुळे तक्रार निवारण प्रक्रियेच्या पारदर्शकतेत सुधारणा होईल. तक्रारदाराला स्व-निर्मित (आॅटो-जनरेटेड) पोचपावती मिळेल. आपल्या तक्रारीचा मागोवा त्यास ठेवता येईल, तसेच लोकपालाच्या निर्णयाविरुद्ध आॅनलाइन अपीलही करता येईल. तक्रार निवारण व्यवस्थेवर आपल्या अनुभवाबाबतची प्रतिक्रियाही तक्रारकर्ता नोंदवू शकेल.

काय म्हटले आहे परिपत्रकात?
आरबीआयने १४ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ग्राहकाचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा इतर कुठल्याही तांत्रिक समस्यांमुळे अयशस्वी झालेले व्यवहार हे ग्राह्य व्यवहार म्हणून मोजले जाणार नाहीत.
अन्य अयशस्वी व्यवहार जसे, एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसणे. तसेच बँकांकडून नाकारण्यात आलेले व्यवहार हे एटीएमचे ग्राह्य व्यवहार धरले जाऊ नयेत, असे स्पष्ट केले आहे.

नव्या नियमांनुसार चुकीचा किंवा अवैध पिन क्रमांक टाकल्यानेही अयशस्वी होणारे व्यवहार गाह्य एटीएम व्यवहार म्हणून मोजले जाणार नाहीत, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. बँका ग्राहकांना अयशस्वी एटीएम व्यवहारासाठी शुल्क आकारू शकत नाहीत, असे आरबीआयने म्हटले आहे. तांत्रिक कारणांमुळे अयशस्वी झालेल्या व्यवहार, एटीएममध्ये चलन उपलब्ध नसणे इत्यादी व्यवहारांचादेखील मोफत एटीएम व्यवहारांमध्ये समावेश आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

एटीएममार्फत बॅलन्सची चौकशी, चेकबुक विनंती, कर भरणे, निधी हस्तांतरण करणे आदी व्यवहार हे मोफत एटीएमम व्यवहारांच्या संख्येचा भाग नसतील, असे आरबीयने म्हटले आहे.

Web Title: Reserve Bank puts pressure on banks for free Transaction ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.