Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्सची ‘ओह माय गणेशा’ मोहीम

रिलायन्सची ‘ओह माय गणेशा’ मोहीम

गणेश आवाहनाच्या माध्यमातून दोन मोठे सुपरमार्केट ब्रॅण्ड्स जनजागृती करणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:27 AM2019-09-04T03:27:34+5:302019-09-04T03:27:44+5:30

गणेश आवाहनाच्या माध्यमातून दोन मोठे सुपरमार्केट ब्रॅण्ड्स जनजागृती करणार आहेत.

 Reliance's 'Oh My Ganesha' campaign | रिलायन्सची ‘ओह माय गणेशा’ मोहीम

रिलायन्सची ‘ओह माय गणेशा’ मोहीम

मुंबई : प्रदूषण, स्मार्टफोनचे वाढते व्यसन, कचऱ्याची वाढती समस्या, पाण्याच्या नियोजनाची समस्या या सगळ्या समस्यांचे भविष्यकाळातील आव्हान लक्षात घेत रिलायन्स स्मार्ट आणि रिलायन्स फ्रेशने थेट गणेशाचे आवाहन करत त्याला साकडे घातले आहे. या समस्यांतून सुटका व्हावी, तसेच लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी रिलायन्स स्मार्ट आणि रिलायन्स फ्रेश या ब्रॅण्डमार्फत ‘#ओह माय गणेशा’ हे गणेशाचे आवाहन करणारी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भविष्यकाळातील मानवासमोरील समस्यांच्या बाबतीत गाणी आणि व्हिडीओमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे.

गणपती विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गणेश आवाहनाच्या माध्यमातून हे दोन मोठे सुपरमार्केट ब्रॅण्ड्स जनजागृती करणार आहेत. लहान मुले या मोहिमेत सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार असून त्यांनी गणेश आवाहनाचे गाणे म्हटले असून त्याचा व्हिडीओही तयार करण्यात आला आहे. आम्ही लोकांच्या दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाºया वस्तूंच्या माध्यमातून जोडले जातो. त्यामुळे सण-उत्सवांच्या माध्यमातून लोकांशी असलेली आमची कनेक्टिव्हीटी जास्त दिसून येते आणि प्रभावी ठरते. या मोहिमेच्या माध्यमातून रिलायन्स फ्रेश आणि रिलायन्स स्मार्ट हे दोन्ही ब्रॅण्ड्स लोकांचे लक्ष या समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रमुख कार्यकारी अधिकारी दामोदर मल्ल यांनी दिली.

Web Title:  Reliance's 'Oh My Ganesha' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.