Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन महिन्यांत १.६९ लाख कोटींचा विक्रमी निधी उभारल्यानंतर मुकेश अंबानींची मोठी घोषणा

दोन महिन्यांत १.६९ लाख कोटींचा विक्रमी निधी उभारल्यानंतर मुकेश अंबानींची मोठी घोषणा

रिलायन्सने आपली डिजिटल शाखा ‘जिओ प्लॅटफॉर्म’मधील पंचवीस टक्क्यांपेक्षा थोडासा कमी हिस्सा जागतिक गुंतवणूक संस्थांना विकून १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:12 AM2020-06-20T04:12:19+5:302020-06-20T07:14:08+5:30

रिलायन्सने आपली डिजिटल शाखा ‘जिओ प्लॅटफॉर्म’मधील पंचवीस टक्क्यांपेक्षा थोडासा कमी हिस्सा जागतिक गुंतवणूक संस्थांना विकून १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा केला आहे.

Reliance Industries gets out of debt declares Mukesh Ambani | दोन महिन्यांत १.६९ लाख कोटींचा विक्रमी निधी उभारल्यानंतर मुकेश अंबानींची मोठी घोषणा

दोन महिन्यांत १.६९ लाख कोटींचा विक्रमी निधी उभारल्यानंतर मुकेश अंबानींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : दोन महिन्यांत उभारण्यात आलेल्या १.६९ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी निधीनंतर रिलायन्स इंडस्ट्रिज आता कर्जातून मुक्त झाल्याचे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे.

अंबानी यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, रिलायन्सने आपली डिजिटल शाखा ‘जिओ प्लॅटफॉर्म’मधील पंचवीस टक्क्यांपेक्षा थोडासा कमी हिस्सा जागतिक गुंतवणूक संस्थांना विकून १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा केला आहे. तसेच राइट्स इश्यूच्या माध्यमातून कंपनीने आणखी ५३,१२४.२० कोटी रुपये उभे केले आहेत.

३१ मार्च २०२० रोजी कंपनीवर १.६१ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. ३१ मार्च २०२१ पर्यंत कंपनीला कर्जातून मुक्त करण्याचे वचन मी दिले होते. या मुदतीच्या किती तरी आधीच मी वचनपूर्ती केली आहे, असे अंबानी यांनी म्हटले आहे.

सौदीच्या कंपनीने केली जिओमध्ये गुंतवणूक
सौदी अरेबियाच्या पीआयएफ या गुंतवणूक संस्थेने जिओ प्लॅटफॉर्म मधील २.३२ टक्के हिस्सेदारी ११,३६७ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. कंपनीने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. कंपन्यांकडून एप्रिल २०२० पासून आजपर्यंत १,१५,६९३.९५ कोटी रुपये उभे करण्यात आले आहेत.

Web Title: Reliance Industries gets out of debt declares Mukesh Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.