Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance Industries नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतील ४० टक्के हिस्सा केला खरेदी

Reliance Industries नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतील ४० टक्के हिस्सा केला खरेदी

Reliance industries buys 40 percent stake in Manish Malhotra Company : मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीत पहिल्यांदा कोणती बाहेरील गुंतवणूक झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 06:16 PM2021-10-16T18:16:18+5:302021-10-16T18:16:40+5:30

Reliance industries buys 40 percent stake in Manish Malhotra Company : मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीत पहिल्यांदा कोणती बाहेरील गुंतवणूक झाली आहे.

Reliance Brands To Acquire 40 percent Stake In Manish Malhotras Designer Label | Reliance Industries नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतील ४० टक्के हिस्सा केला खरेदी

Reliance Industries नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतील ४० टक्के हिस्सा केला खरेदी

Highlightsमनीष मल्होत्रा यांच्या कंपनीत पहिल्यांदा कोणती बाहेरील गुंतवणूक झाली आहे.

Reliance Industries ची सब्सिडायरी रिलायन्स ब्रांड्स लिमिटेड (RBL) नंम मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतील ४० टक्के हिस्सा खरेदी केला आहे. कंपनीनं शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. मनीष मल्होत्रा ब्रांडमध्ये पहिल्यांदा कोणती बाहेरील गुंतवणूक झाली आहे. मनीष मल्होत्रा यांनी व्हर्च्युअल स्टोअरही सुरू केलं आहे. यावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

मनीष मल्होत्रा यांच्या या कंपनीची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली होती. मनीष मल्होत्रा यांचे ४ फ्लॅगशिप स्टोअर मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथे आहेत. याशिवाय या लेबलचे 1.20 कोटी सोशल फॉलोअर्स आहेत. देशातील सर्वात मोठा लक्झरी रिटेलर RBL गेल्या १४ वर्षांमध्ये ग्लोबल लक्झरी ब्रांडमधून प्रिमिअम ब्रांड बनला आहे.

“मनीष मल्होत्रा यांच्या सोबत भागीदारी करून आम्ही भारतीय आर्ट आणि संस्कृतीला प्रोत्साहन देऊ इच्छित आहोत. आंत्रप्रेन्योर म्हणून मनीष मल्होत्रांनी हा ब्रांड सुरू केला होता. ते वेळेपूर्वीचा विचार करतात,” असं RBL कडून सांगण्यात आलं. “दिल्ली आणि हैदराबादमध्ये लक्झरी स्टोअरपासून भारतातील पहिलं व्हर्च्युअल स्टोअर सुरू करणं आणि भारतातील लग्न कार्यांमध्ये काही चांगलं करणं हा माझा उद्देश आहे आणि प्रत्येक क्षेत्रात बेंचमार्क तयार केला जावा,” असं मनीष मल्होत्रांनी यावेळी सांगितलं.

Web Title: Reliance Brands To Acquire 40 percent Stake In Manish Malhotras Designer Label

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.