Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी महसुलाचा विक्रम, देशातील लॉकडाऊन टळला

जीएसटी महसुलाचा विक्रम, देशातील लॉकडाऊन टळला

अंमलबजावणीनंतर प्रथमच भरघोस महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:09 AM2021-05-02T07:09:25+5:302021-05-02T07:09:51+5:30

अंमलबजावणीनंतर प्रथमच भरघोस महसूल

The record of GST revenue, the country avoided lockdown | जीएसटी महसुलाचा विक्रम, देशातील लॉकडाऊन टळला

जीएसटी महसुलाचा विक्रम, देशातील लॉकडाऊन टळला

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा कहर वाढत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी परिस्थिती ओढवेल की काय अशी चिंता होती. मात्र वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून १ लाख ४१ हजार ३८४ कोटींचा महसूल मिळाल्याने लॉकडाऊनची शक्यता मावळली आहे. 

एप्रिल महिन्यात कोरोनाचा  प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढत असताना आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून प्रथमच सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे. याआधी मार्च महिन्यात जीएसटीमधून १ लाख २३ हजार ९०२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटीमधून मिळणारा महसूल १४ टक्क्यांनी वाढला आहे. 

७ महिन्यांतील उच्चांक एप्रिलमध्ये जीएसटीच्या माध्यमातून 
१ लाख ४१ हजार ३८४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यातील २७ हजार ८३७ कोटी रुपये केंद्रीय जीएसटी, तर ३५,६२१ हजार कोटी रुपये राज्याच्या जीएसटीतून मिळाले आहेत. इंटिग्रेटेड जीएसटीच्या माध्यमातून ६४,४८१ कोटी आणि सेसच्या माध्यमातून ९ हजार ४४५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या ७ महिन्यांपासून केंद्राला १ लाख कोटीहून अधिक जीएसटी मिळतो आहे.

Web Title: The record of GST revenue, the country avoided lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.