RBI slaps Rs 7 crore penalty on SBI for violating various norms | SBIकडून नियमांचे उल्लंघन, RBIने ठोठावला 7 कोटी रुपयांचा दंड!
SBIकडून नियमांचे उल्लंघन, RBIने ठोठावला 7 कोटी रुपयांचा दंड!

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय) या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने मोठा झटका दिला आहे. आरबीआयने एसबीआयवर 7 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) आणि इतर तरतुदीसंबंधी नियमांचे पालन एसबीआयकडून करण्यात आले नाही, म्हणून आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. याशिवाय, युनियन बँक ऑफ इंडियाला सुद्धा 10 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

एसबीआयने आयआरएसी नियमांचे पालन केले नाही. तसेच, बँकेने चालू खाते उघडण्यासाठी आणि ऑपरेटिंगसाठी आचारसंहितेचे उल्लंघन केले. याशिवाय, एसबीआयवर फसवणूक आणि यासंबंधी रिपोर्टिंगच्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. चौकशी अहवाल आणि अन्य गरजेची कागदपत्रे पाहिल्यानंतर आरबीआयकडून एसबीआयला नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर एसबीआयकडून मिळालेल्या उत्तरानंतर आरबीआयकडून दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

युनियन बँकेला 10 लाखांचा दंड
सायबर सुरक्षा संबंधित निर्देशांचे पालन केले नसल्याच्या आरोपाखाली आरबीआयने यूनियन बँक ऑफ इंडियावर 10 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या नाटिसीत हा दंड 9 जुलै 2019 रोजी ठोठावण्यात आला. युनियन बँकेकडून SWIFT नियमांचे पालन करताना त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.


Web Title: RBI slaps Rs 7 crore penalty on SBI for violating various norms
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.