lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्यासह इतरही फायदे...

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्यासह इतरही फायदे...

ration card : सरकारने पुढील 4 महिने म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत गरीबांना मोफत धान्य मिळेल अशी घोषणा केली होती. त्यानुसार रेशन कार्डद्वारे दरमहा 5 किलो धान्य नागरिकांना मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 07:27 PM2021-07-25T19:27:42+5:302021-07-25T19:34:08+5:30

ration card : सरकारने पुढील 4 महिने म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत गरीबांना मोफत धान्य मिळेल अशी घोषणा केली होती. त्यानुसार रेशन कार्डद्वारे दरमहा 5 किलो धान्य नागरिकांना मिळू शकते.

ration card holders will get many banefits on this card know about it here | रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्यासह इतरही फायदे...

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्यासह इतरही फायदे...

नवी दिल्ली : रेशन कार्ड धारकांसाठी (Ration Card)  एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडेही रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मोफत धान्याशिवाय इतरही फायदे मिळतात. सध्या श्रीमंत किंवा गरीब सर्वांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यावश्यक कार्ड आहे. हे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते आणि यावर कोरोना काळात सरकारने देशातील गरीब लोकांना मोफत धान्य सुद्धा दिले आहे. सरकारने पुढील 4 महिने म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत गरीबांना मोफत धान्य मिळेल अशी घोषणा केली होती. त्यानुसार रेशन कार्डद्वारे दरमहा 5 किलो धान्य नागरिकांना मिळू शकते.

रेशन कार्डचे फायदे...
रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठीच होत नाही. याशिवाय याच्या अनेक सुविधा मिळतात. एक ओळखपत्र म्हणूनही रेशन कार्ड उपयुक्त आहे. मतदार ओळखपत्र काढायचे असेल, तर रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तरी रेशन कार्डची आवश्यकता असते. बँकेशी संबंधित काही काम असेल, तरीही त्यातील बहुतांश कामांसाठी रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून याचा उपयोग होऊ शकतो.

कोण करू शकतं अर्ज?
तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली असाल, म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न 27 हजारांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही बीपीएल (Below Poverty Line) रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. त्यापेक्षा जास्त असेल तर एपीएलसाठी अर्ज करता येतो. राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो.

रेशनकार्डसाठी करा ऑनलाइन अर्ज ...
>> यासाठी सर्वात आधी तुम्ही राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
>> तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर mahafood.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करू शकता.
>>  या वेबसाइटवर Apply online for ration card  या लिंकवर क्लिक करा.
>> आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी रेशनकार्ड मिळविण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून देता येईल.
>> रेशनकार्डसाठी अर्ज फी 05 ते 45 रुपयापर्यंत आहे.
>> अर्ज भरल्यानंतर फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
>> फील्ड व्हेरिफिकेशननंतर तुमचा अर्ज योग्य आढळल्यास तुमचे रेशन कार्ड तयार होईल.

कोणती कागदपत्रे आवश्यक?
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, शासनाने दिलेली कोणतीही ओळखपत्र, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड बनविण्यासाठी आयडी पुरावा म्हणून देता येईल. या व्यतिरिक्त, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडे कराराची कागदपत्रेसुद्धा पत्त्याच्या पुरावा म्हणून आवश्यक असतील.
 

Web Title: ration card holders will get many banefits on this card know about it here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.