Lokmat Money > बिझनेस न्यूज > राहुल बजाज यांचा Bajaj Auto च्या अध्यक्षपदाचा राजीनामा; ‘हे’ आहे कारण

राहुल बजाज यांचा Bajaj Auto च्या अध्यक्षपदाचा राजीनामा; ‘हे’ आहे कारण

Bajaj Auto: देशातील आघाडीची वाहन कंपनी असलेल्या Bajaj Auto च्या अध्यक्षपदाचा राजीनामा राहुल बजाज यांनी दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 06:18 PM2021-04-29T18:18:58+5:302021-04-29T18:21:14+5:30

Bajaj Auto: देशातील आघाडीची वाहन कंपनी असलेल्या Bajaj Auto च्या अध्यक्षपदाचा राजीनामा राहुल बजाज यांनी दिला आहे.

rahul bajaj resign as chairman of bajaj auto after five decades | राहुल बजाज यांचा Bajaj Auto च्या अध्यक्षपदाचा राजीनामा; ‘हे’ आहे कारण

राहुल बजाज यांचा Bajaj Auto च्या अध्यक्षपदाचा राजीनामा; ‘हे’ आहे कारण

Highlightsराहुल बजाज यांचा Bajaj Auto च्या अध्यक्षपदाचा राजीनामाबजाज ऑटोकडून निवेदन प्रसिद्धबजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा

नवी दिल्ली: देशातील आघाडीची वाहन कंपनी असलेल्या Bajaj Auto च्या अध्यक्षपदाचा राजीनामा राहुल बजाज यांनी दिला आहे. ३० एप्रिल २०२१ च्या कामकाजांच्या तासानंतर ते या पदावर राहणार नाहीत. गेल्या पाच दशकांपासून राहुल बजाज यांनी Bajaj Auto ची धुरा यशस्वीपणे सांभाळली असल्याचे सांगितले जात आहे. (rahul bajaj resign as chairman of bajaj auto after five decades)

बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. ५ दशकांच्या कारकिर्दीनंतर राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राहुल बजाज यांच्यानंतर आता ६७ वर्षीय नीरज बजाज Bajaj Auto चे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. 

मारुतीचे अनेक प्रकल्प तात्पुरते बंद; आता कंपनी ऑक्सिजनची निर्मिती करणार

बजाज ऑटोकडून निवेदन प्रसिद्ध

बजाज ऑटोने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. राहुल बजाज सन १९७२ पासून नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन पदावर आहेत. गेल्या ५ दशकांपासून ते कंपनीशी जोडले गेले आहेत. राहुल बजाज यांनी वयोमानामुळे ३० एप्रिल २०२१ पासून तत्काळ प्रभावाने नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. राहुल बजाज ८२ वर्षांचे आहेत. 

जमनालाल बजाज यांचे नातू

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी स्वातंत्र्यपूर्व पश्चिम बंगालमधील मारवाडी कुटुंबात झाला. राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात बीए मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले. त्यानंतर त्यांनी तिथल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची डिग्री पूर्ण केली. यानंतर उमेदवारीच्या काळात राहुल बजाज यांनी बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीत तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. 

मस्तच! आता केवळ २० रुपयांत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग, भरघोस डेटा आणि....

बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा

राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.
 

Web Title: rahul bajaj resign as chairman of bajaj auto after five decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.