Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF : 'ही' सरकारी योजना तुम्हाला बनवेल करोडपती, फक्त व्याजातून मिळतील 65 लाख रुपये

PPF : 'ही' सरकारी योजना तुम्हाला बनवेल करोडपती, फक्त व्याजातून मिळतील 65 लाख रुपये

PPF : पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु तो आणखी 5-5 वर्षे वाढवता येईल. म्हणजेच त्यात 25 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 05:47 PM2022-12-04T17:47:07+5:302022-12-04T17:48:04+5:30

PPF : पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु तो आणखी 5-5 वर्षे वाढवता येईल. म्हणजेच त्यात 25 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

public provident fund a government scheme will give crore rupees including rs 65 lakh interest rate | PPF : 'ही' सरकारी योजना तुम्हाला बनवेल करोडपती, फक्त व्याजातून मिळतील 65 लाख रुपये

PPF : 'ही' सरकारी योजना तुम्हाला बनवेल करोडपती, फक्त व्याजातून मिळतील 65 लाख रुपये

नवी दिल्ली : अनेक सरकारी योजना गुंतवणूकदारांना चांगले व्याज मिळवून देतात. यासोबतच या योजनांमध्ये करमुक्तसह (Tax Free Government Scheme) इतर फायदेही दिले जातात. तसेच, सरकारी योजनांमध्ये थोडीशी गुंतवणूक करून चांगले पैसे कमावता येतात, ज्यामध्ये कोणताही धोका नसतो. 

अशाच एका योजनेबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये गुंतवणूक करून करोडो रुपये जमा केले जाऊ शकतात. करोडो रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला 25 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल, ज्यावर तुम्हाला 65 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल. त्यात दरवर्षी किंवा महिन्याला गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याज मिळेल. ही योजना देखील करमुक्त आहे आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवण्याचा पर्याय देखील देते.

ही योजना पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF) आहे, ज्याचे वार्षिक व्याज 7.1 टक्के आहे आणि किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकतात. चक्रवाढीचा लाभ देखील वार्षिक आधारावर उपलब्ध आहे. सरकार दर तिमाहीचा आढावा घेऊन या योजनेतील व्याज वाढवते. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु तो आणखी 5-5 वर्षे वाढवता येईल. म्हणजेच त्यात 25 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

कसे जमा होतील करोडो रुपये? 
जर कोणत्याही गुंतवणूकदाराने या योजनेत दरमहा 12,500  रुपये गुंतवले आणि 12 महिन्यांत 12,500 रुपयांच्या हिशोबाने वार्षिक 1.50 लाख रुपये गुंतवले, तर पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार, 15 वर्षात एकूण 40.68 लाख रुपयांची गुंतवणूक होईल, ज्यामध्ये एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये आणि व्याजाची रक्कम 18.18 लाख रुपये होईल. आता जर आणखी 5 वर्षांसाठी वाढवली आणि 5 वर्षांसाठी एकदा गुंतवणूक केली तर एकूण मॅच्युरिटी 25 वर्षे होईल. त्यानुसार 1 कोटी 03 लाख 08 हजार 15 रुपये पीपीएफ खात्यात जमा होतील. 25 वर्षात गुंतवणुकीची रक्कम फक्त 37.50 लाख रुपये असेल, तर मिळणारे व्याज 65 लाख 58 हजार रुपये होईल.

Web Title: public provident fund a government scheme will give crore rupees including rs 65 lakh interest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.