Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office Scheme: दर महिन्याला पोस्टात 2000 जमा करा, एवढे लाख मिळवा; जाणून घ्या...

Post Office Scheme: दर महिन्याला पोस्टात 2000 जमा करा, एवढे लाख मिळवा; जाणून घ्या...

Post Office Saving Scheme: अनेकांकडे बचत केलेले पैसे असतात परंतू ते योग्य जागी न गुंतविल्याने तेवढेच राहतात व नुकसान होते. अनेकजण त्यांची कमाई कुठेच गुंतवत नाहीत. असे करून ते प्रत्येक दिवशी नुकसान झेलतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 03:36 PM2021-08-01T15:36:17+5:302021-08-01T15:43:56+5:30

Post Office Saving Scheme: अनेकांकडे बचत केलेले पैसे असतात परंतू ते योग्य जागी न गुंतविल्याने तेवढेच राहतात व नुकसान होते. अनेकजण त्यांची कमाई कुठेच गुंतवत नाहीत. असे करून ते प्रत्येक दिवशी नुकसान झेलतात.

Post Office Saving Scheme: Deposit 2000 in Post every month, get Rs.6.36 lakh return Find out ... | Post Office Scheme: दर महिन्याला पोस्टात 2000 जमा करा, एवढे लाख मिळवा; जाणून घ्या...

Post Office Scheme: दर महिन्याला पोस्टात 2000 जमा करा, एवढे लाख मिळवा; जाणून घ्या...

Post Office Saving Scheme: पैशांची बचत करताना ते योग्य ठिकाणी गुंतविणेदेखील गरजेचे असते. अनेकांकडे बचत केलेले पैसे असतात परंतू ते योग्य जागी न गुंतविल्याने तेवढेच राहतात व नुकसान होते. अनेकजण त्यांची कमाई कुठेच गुंतवत नाहीत. असे करून ते प्रत्येक दिवशी नुकसान झेलतात. तुम्ही तुमच्या पैशांवर व्याजाद्वारे मोठी रक्कम मिळवू शकता. (invest 2000 rupees monthly in PPF Scheme, get return 6,31,135 rs in Post Office Saving Scheme)

LIC Child Plans: मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी LIC चे तीन बेस्ट प्लॅन; तिसरा तुमच्यासाठीही घेता येईल

तुम्ही जर सुरक्षित गुंतवणूक करायचे म्हणत असाल तर पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) मध्ये गुंतवणूक करा. या स्कीममध्ये सध्या 7.10 टक्के व्याज देण्यात येत आहे. 
खास बाब म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 2 हजार रुपये जमा करायचे आहेत. 15 वर्षांनी तुम्हाला त्याचे 6,31,135 रुपये मिळतील. आता प्रश्न हा आहे की, एवढी मोठी रक्कम कशी मिळेल आणि एकूण किती पैसे गुंतवावे लागतील? चला जाणून घेऊया. 

LIC च्या आयपीओचा पॉलिसीधारकांना मोठा फायदा; फक्त 'ही' तयारी ठेवा, मालामाल व्हा!

पहिली महत्वाची बाब म्हणजे ही स्कीम 15 वर्षांसाठी आहे. यातून मध्येच पैसे काढता येत नाहीत. 15 वर्षांनी तुम्ही याची मुदत 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. तुम्हाला गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा फायदा दिला जातो. जर तुम्ही 15 वर्षांसाठी दर महिन्याला 2 हजार रुपये गुंतविले तर एकूण 3,36,000 रुपयांची रक्कम जमा होईल. यावर तुम्हाला 2,71,135 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेय मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 6,31,135 रुपये हाती येतील. 

LIC चा नवा प्लॅन! आता म्हातारपणी नाही, 40 व्या वर्षीच पेन्शन चालू होणार

पीपीएफ खाते उघडण्य़ासाठी तुम्हाला केवळ 100 रुपये खर्च करावे लागतील. एका आर्थिक वर्षात कमीतकमी 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. तसेच कमीतकमी 500 रुपये गुंतवू शकता. वर्षाला 500 रुपये गुंतविले नाहीत तर तुमचे पीपीएफ खाते निष्क्रीय होते.
 

Web Title: Post Office Saving Scheme: Deposit 2000 in Post every month, get Rs.6.36 lakh return Find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.