Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएनबी बँक घोटाळा : बँकेच्या कर्जाची भरपाई करण्यास तयार; चोक्सीचा न्यायालयात अर्ज

पीएनबी बँक घोटाळा : बँकेच्या कर्जाची भरपाई करण्यास तयार; चोक्सीचा न्यायालयात अर्ज

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळाप्रकरणी आरोपी मेहुल चोक्सी याने आपली कंपनी गीतांजली जेम्सला आजही ग्राहकांकडून ८ हजार कोटी रुपये येणे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:46 AM2019-09-29T06:46:19+5:302019-09-29T06:46:56+5:30

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळाप्रकरणी आरोपी मेहुल चोक्सी याने आपली कंपनी गीतांजली जेम्सला आजही ग्राहकांकडून ८ हजार कोटी रुपये येणे आहे.

PNB Bank scam: ready to pay bank loan; Mehul Choksi's application in court | पीएनबी बँक घोटाळा : बँकेच्या कर्जाची भरपाई करण्यास तयार; चोक्सीचा न्यायालयात अर्ज

पीएनबी बँक घोटाळा : बँकेच्या कर्जाची भरपाई करण्यास तयार; चोक्सीचा न्यायालयात अर्ज

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळाप्रकरणी आरोपी मेहुल चोक्सी याने आपली कंपनी गीतांजली जेम्सला आजही ग्राहकांकडून ८ हजार कोटी रुपये येणे आहे. हे येणे आल्यास बँकेचे सर्व कर्ज फेडू शकू. त्यामुळे कंपनी जप्त करू नये, अशी विनंती करणारा अर्ज शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायालयात केला.

पीएनबी घोटाळाप्रकरणी खुद्द सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अँटिग्वाला येऊन चौकशी करावी, तसेच प्रकृती ठीक होईपर्यंत आपल्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात सादर करावे, अशीही विनंती त्याने केली. जप्त न केलेली मात्र मार्केटमध्ये विकता येण्याजोगी संपत्ती व फर्म ईडीला ताब्यात न घेण्याचे निर्देश द्यावेत, असे अर्जात म्हटले. गीता जेम्सला ग्राहकांकडून ८,५६७ कोटी येणे होते. बँक कर्जाची रक्कम ६,०९७.६३ कोटी आहे. गुन्हा नोंदविल्याने मी ती ग्राहकांकडून वसूल करू शकत नाही, असे चोक्सीने अर्जात म्हटले. या अर्जावर १० आॅक्टोबर रोजी सुनावणी आहे.

Web Title: PNB Bank scam: ready to pay bank loan; Mehul Choksi's application in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.