Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकऱ्या टिकणार, टॅक्स वाचणार; 'अच्छे दिन'साठी धक्कादायक निर्णय घेणार मोदी सरकार!

नोकऱ्या टिकणार, टॅक्स वाचणार; 'अच्छे दिन'साठी धक्कादायक निर्णय घेणार मोदी सरकार!

आर्थिक मंदीचे सावट, देशाच्या अर्थव्यवस्थेचा ढासळत असलेला तोल, वाढत असलेली बेरोजगारी यामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 10:22 AM2019-08-19T10:22:04+5:302019-08-19T10:40:49+5:30

आर्थिक मंदीचे सावट, देशाच्या अर्थव्यवस्थेचा ढासळत असलेला तोल, वाढत असलेली बेरोजगारी यामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

PM Narendra Modi will take big decision to shines economy | नोकऱ्या टिकणार, टॅक्स वाचणार; 'अच्छे दिन'साठी धक्कादायक निर्णय घेणार मोदी सरकार!

नोकऱ्या टिकणार, टॅक्स वाचणार; 'अच्छे दिन'साठी धक्कादायक निर्णय घेणार मोदी सरकार!

नवी दिल्ली -  आर्थिक मंदीचे सावट, देशाच्या अर्थव्यवस्थेचा ढासळत असलेला तोल, वाढत असलेली बेरोजगारी यामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्थव्यवस्थेतीत सरकारच्या अडचणीत वाढ होत असून,  देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार लकवरच काही मोठे आणि धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे.  

करांमध्ये सवलत, तसेच नोकऱ्या टिकवण्यासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय अशा घोषणांची सुरुवात आजपासून होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या उद्योगांना पॅकेज देण्याबाबतचे संकेत आधीच मिळाले होते. मात्र सरकार केवळ आर्थिक पॅकेजवर थांबण्याची शक्यत नाही.  

पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीयअर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गात कुठलेही अडथळे येऊ नयेत, अशा उद्देशाने हे मोठे निर्णय़ घेतले जाणार आहे. उद्योग जगतात निर्माण झालेले चिंतेचे मळभ दूर करून ढासळता आर्थिक डोलारा सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: याबाबत हस्तक्षेप करणार असून, देशी आणि विदेशी गुंतवणुकदारांमध्ये विश्वास जागवण्यासाठी त्यांच्याशी मोदी थेट संवाद साधू शकतात.  दरम्यान, उद्योगांना पॅकेजची घोषणा करण्यात आल्यानंतर तत्काळ इतरही काही मोठे निर्णय घेतले जातील. यामध्ये सरकारी खर्चात कपातीसारखा मोठा निर्णयही समाविष्ट असू शकतो.  


खर्चामध्ये बचत करण्यासाठी सर्वप्रथम मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनावश्यक सुविधा आणि दैनंदिन खर्चात कपात केली जाईल. मात्र कल्याणकारी योजनांसाठीच्या निधीमध्ये कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इतर उपायांमध्ये करसुधारणेचा समावेश असेल, तसेच नोकऱ्या वाचवण्यासाठी उद्योगांना आतापर्यंतचे सर्वात वेगळे पॅकेज देण्यात येणार आहे.  

मोदी सरकारकडून घेण्यात येणारे संभाव्य निर्णय 

 करसुधारणा 
 सर्वसामान्यांसह उद्योगांना करांमध्ये दिलासा देण्यासाठी विचार 

 नोकऱ्या टिकवण्यासाठी
 उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी उद्योगांना वेगळ्या पद्धतीचे पॅकेज देण्याची तयारी 

 गुंतवणुकदारांशी संवाद 
गुंतवणूक वाढवण्यासाठी देशातील आणि परदेशातील गुंतवणुकदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधू शकतात संवाद

खर्चात कपात 
सरकारमधील अनावश्यक खर्चांना फाटा देऊन दोन वर्षांत सुमारे 75 हजार कोटी रुपये वाचवण्याचे लक्ष्य  

Web Title: PM Narendra Modi will take big decision to shines economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.