Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात आलीय 1 हजारांची नवी नोट, जाणून घ्या काय खरं अन् खोटं?

बाजारात आलीय 1 हजारांची नवी नोट, जाणून घ्या काय खरं अन् खोटं?

सरकारची धोरणं आणि योजनांबद्दल खात्रीशीर माहिती देणाऱ्या आणि फेक माहितीची खातरजमा करणाऱ्या प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोच्या ट्विटवर हँडलवरुन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 03:32 PM2020-03-04T15:32:48+5:302020-03-04T15:34:12+5:30

सरकारची धोरणं आणि योजनांबद्दल खात्रीशीर माहिती देणाऱ्या आणि फेक माहितीची खातरजमा करणाऱ्या प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोच्या ट्विटवर हँडलवरुन

The pictures of 'new' Rs 1000 notes are fake, know the viral truth by RBI | बाजारात आलीय 1 हजारांची नवी नोट, जाणून घ्या काय खरं अन् खोटं?

बाजारात आलीय 1 हजारांची नवी नोट, जाणून घ्या काय खरं अन् खोटं?

नवी दिल्ली - इंडियन बँकेपाठोपाठ आता सर्वच बँकांच्याएटीएममधून दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बंद होणार आहे. त्याऐवजी 100 रुपये ते 500 रुपये मूल्याच्या नोटा एटीएममध्ये मिळतील. त्यामुळे ग्राहकांना मोठाच दिलासा मिळणार आहे. तर, दोन हजारांच्या नोटा व्यवहारात कमी झाल्याने, आता 1 हजार रुपयाची नवी नोट बाजारात येणार असल्याची चर्चा होत्या. विशेष म्हणजे सोशल मीडियावर एक नोट व्हायरल होत असून ती सरकारने जारी केलेली नवीन नोट असल्याचे सांगितले जाते. 

सोशल मीडियावरील व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 1 हजार रुपयांची नवी नोट जारी करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, ही अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय. कारण, स्वत: सरकारच्या ट्विटर हँडलवरुन याबाबत खुलासा करण्यात आला आहे. 

सरकारची धोरणं आणि योजनांबद्दल खात्रीशीर माहिती देणाऱ्या आणि फेक माहितीची खातरजमा करणाऱ्या प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोच्या ट्विटवर हँडलवरुन याबाबत खुलासा करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 1 हजार रुपयांची अशी कुठलिही नोट जारी करण्यात आली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो फेक असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे.   


दरम्यान, आपल्या सुमारे 40 हजार एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न ठेवण्याचा निर्णय इंडियन बँकेने आधीच घेतला आहे. त्याची अंमलबजावणी 1 मार्चपासून होणार आहे. एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्यावर त्याचे सुटे करण्यासाठी ग्राहकांना खूप वणवण करावी लागते. अनेकदा ते बँकेत सुटे घेण्यासाठी येतात. त्यात फार वेळही जातो. त्यामुळे आम्ही दोन हजार रुपयांच्या नोटा आमच्या एटीएममध्ये ठेवणार नाही, असे इंडियन बँकेने जाहीर केले होते. त्यानंतर, 1 हजार रुपयांची नवी नोट बाजारात येणार, अशी अफवा पसरवली जात होती. 
 

Web Title: The pictures of 'new' Rs 1000 notes are fake, know the viral truth by RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.