Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol, Diesel Price: पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा झटका; अनेक ठिकाणी पेट्रोल शंभरीपार

Petrol, Diesel Price: पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा झटका; अनेक ठिकाणी पेट्रोल शंभरीपार

आतापर्यंत त्यात प्रतिलीटर १.९१ रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलचे दरही अडीच रुपयांनी वाढले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:30 AM2021-05-17T07:30:28+5:302021-05-17T07:31:03+5:30

आतापर्यंत त्यात प्रतिलीटर १.९१ रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलचे दरही अडीच रुपयांनी वाढले आहेत.

Petrol, diesel price hike; Hundreds of petrol in many places | Petrol, Diesel Price: पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा झटका; अनेक ठिकाणी पेट्रोल शंभरीपार

Petrol, Diesel Price: पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा झटका; अनेक ठिकाणी पेट्रोल शंभरीपार

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी इंधन दरवाढीचा पुन्हा एकदा झटका दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे लीटरमागे २४ आणि २७ पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. 

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यास तेल कंपन्यांनी सुरुवात केली. गेल्या आठवडाभरातील ही पाचवी वाढ आहे, तर ४ मेनंतर आतापर्यंत ९ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईत ४ मे रोजी पेट्रोलचा दर ९६.९७ रुपये प्रतिलीटर होता. 

त्यानंतर, आतापर्यंत त्यात प्रतिलीटर १.९१ रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलचे दरही अडीच रुपयांनी वाढले आहेत. मुंबईत डिझेलचा दर ९०.४५ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर ९२.५८ रुपये, तर डिझेलचे दर ८३.२२ रुपये प्रतिलीटर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला कच्चे तेल साधारणत: ६५ डॉलर्स प्रति बॅरल होते. ते सध्या ६६.५० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.

मे महिन्यात डिझेलची जास्त दरवाढ
मे महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची दरवाढ जास्त झाली आहे. डिझेलचे दर सरासरी २.५० रुपयांनी वाढले आहेत. डिझेल दरवाढीचा परिणाम भाजपला, तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ शकतो.

Web Title: Petrol, diesel price hike; Hundreds of petrol in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.