lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

paytm : कंपनीने कोरोना लस स्लॉट शोधण्यासाठी नवीन टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करण्याची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 03:00 PM2021-05-10T15:00:24+5:302021-05-10T15:00:54+5:30

paytm : कंपनीने कोरोना लस स्लॉट शोधण्यासाठी नवीन टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करण्याची घोषणा केली आहे.

paytm payment gateway waives off transaction fees due to covid relief donations | Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

नवी दिल्ली : जर तुम्ही सुद्धा पेटीएम (Paytm)वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पेटीएमने देशभरात पसरलेल्या कोरोना संकट काळात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने म्हटले आहे की कोरोनाशी संबंधित सर्व लोनवर आता कोणतेही ट्रान्जक्शन शुल्क आकारले जाणार नाही. (paytm payment gateway waives off transaction fees due to covid relief donations)

देशातील सर्व नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना व्यवहारासाठी 0 % शुल्क द्यावे लागेल, असे कंपनीने घोषित केले आहे. ही सुविधा पेमेंट गेटवे (Paytm Payment Gateway या सेवेवर दिली जात आहे. तसेच, या सुविधेमुळे पेमेंट करणे सोपे होईल, असे कंपनीने म्हटले आहे. या व्यतिरिक्त, कोरोना कालावधीत कोणताही व्यत्यय न येता कामे सुरळीतपणे सुरू राहतील, असेही कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने म्हटले आहे की, देशभरातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना पेमेंट गेटवे सेवा प्रदान करीत आहे, ज्या कोरोना साथीच्या काळात लोकांना मदत करत आहेत. दरम्यान, गेल्या कित्येक आठवड्यांत पेटीएम पेमेंट गेटवेकडून स्वयंसेवी संस्थांना दान म्हणून दिलेल्या निधीत 400% वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काय आहे पेटीएम गेटवे?
जर तुम्ही या अॅपद्वारे आपले वीज, पाणी आणि मोबाइल बिले ऑनलाईन पेमेंट करता, ते गेटवेद्वारे केले जाते. याशिवाय, गेटवेचा वापर कार्ड तपशील भरण्यासाठीही केला जातो. याद्वारे ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया सुलभ होते. या व्यतिरिक्त, ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुमच्या डेबिट / क्रेडिट कार्डची माहिती पेमेंट गेटवेला  कन्फर्मेशनसाठी पाठविली जाते.

कंपनी देणार लसीकरण स्लॉटची सुविधा
कंपनीने कोरोना लस स्लॉट शोधण्यासाठी नवीन टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करण्याची घोषणा केली आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे की, पेटीएमवर युजर्स त्यांच्या भागात लसीकरणासाठी नवीन स्लॉट उपलब्ध असतील, तर अलर्ट मिळवू शकतील.

Web Title: paytm payment gateway waives off transaction fees due to covid relief donations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.