Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे...

आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे...

paytm to launch fastag based parking service : फास्टॅगद्वारे पार्किंग शुल्क जमा करण्यात येईल, असे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) सांगितले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 12:43 PM2021-09-14T12:43:00+5:302021-09-14T12:43:41+5:30

paytm to launch fastag based parking service : फास्टॅगद्वारे पार्किंग शुल्क जमा करण्यात येईल, असे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) सांगितले आहे. 

paytm to launch fastag based parking service start with dmrc | आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे...

आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे...

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट सर्व्हिस देणारी कंपनी पेटीएम (Paytm) देशभरात फास्टॅग (FASTag) आधारित पार्किंग सेवा सुरू करणार आहे. यासंदर्भात सोमवारी माहिती देताना पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने  (Paytm Payments Bank Ltd- PPBL) म्हटले आहे की, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (DMRC) भागीदारीत देशातील पहिली फास्टॅग आधारित मेट्रो पार्किंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. फास्टॅगद्वारे पार्किंग शुल्क जमा करण्यात येईल, असे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) सांगितले आहे. 

काश्मिरी गेट मेट्रो स्टेशनवर सुविधा
DMRC चे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह यांनी PPBL ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नातील हे आणखी एक पाऊल आहे, विशेषत: अशा वेळी जेव्हा संपर्कविरहित व्यवहारांची आवश्यकता असते. पेटीएमने काश्मिरी गेट मेट्रो स्टेशनवर फास्टॅग आधारित पार्किंग सुविधा सुरू केली आहे.

दुचाकी वाहनांसाठी मिळेल सुविधा
PPBL वैध FASTag स्टिकर्स असलेल्या कारसाठी सर्व FASTag- आधारित व्यवहारांची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. यासह, काउंटरवर रोख पेमेंटसाठी थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. याव्यतिरिक्त, पेटीएम पेमेंट्स बँकेने पार्किंगच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या दुचाकींसाठी UPI आधारित पेमेंट सोल्यूशन सुरू केले आहे.

शॉपिंग मॉल, रुग्णालयांमध्येही सुरू होईल सुविधा
PPBL शॉपिंग मॉल, हॉस्पिटल आणि विमानतळांवर पार्किंगसाठी डिजिटल पेमेंट सिस्टम लागू करण्यासाठी विविध भागधारकांशी चर्चा करत आहे.


आतापर्यंत 3.47 कोटींहून अधिक फास्टॅग जारी
जूनमध्ये 1 कोटी FASTag जारी करण्याचा आकडा गाठणारी पेटीएम पेमेंट्स बँक देशातील पहिली बँक ठरली. NPCI च्या मते, जून 2021 च्या अखेरीपर्यंत सर्व बँकांनी एकूण 3.47 कोटींहून अधिक फास्टॅग जारी केले होते.

काय आहे फास्टॅग?
फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी - RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल. रोख पैसे देऊन वा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो. पण नवीन नियमांनुसार हा फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही. या व्यक्तीच्या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक अकाऊंटमधून कापली जाईल. टोलनाक्यांवर लोकांची अडचण होऊ नये, म्हणून सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांच्या सगळ्या लेन्स या फास्टॅग लेन्स करण्याचे ठरवले आहे. 


इतर प्रकारांनी टोल भरायचा असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन राखीव ठेवली जाईल. या लेनला 'हायब्रिड लेन' असे म्हटले जाईल. फास्टॅगमुळे होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी होईल. गाड्या न थांबता टोल नाका पार करतील. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि गाड्या खोळंबून राहिल्याने होणाऱ्या धुराचे प्रमाण कमी झाल्याने प्रदूषणही काहीसे कमी होईल. याशिवाय सरकारकडे फास्टॅगमुळे प्रत्येक गाडीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल. म्हणजे गरज भासल्यास एखादी गाडी ट्रॅक करणेही यामुळे सोपे होईल. वाहन चालकांनाही सोबत सुट्टे पैसे वा रोख रक्कम जवळ बाळगावे लागणार नाहीत. याशिवाय वाहनाने प्रवास करणाऱ्यांना खर्चाचा आढावा घेणे सोपे जाईल. कारण टोल डिजीटल पद्धतीने भरल्याने त्याचा तपशील 'अकाऊंट स्टेटमेंट'मध्ये मिळेल.

Web Title: paytm to launch fastag based parking service start with dmrc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.