Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिल्लीतील ओरिएंटल ग्रुपकडे ३ हजार कोटींचे काळे धन?

दिल्लीतील ओरिएंटल ग्रुपकडे ३ हजार कोटींचे काळे धन?

गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओरिएंटल इंडिया ग्रुपच्या २५ ठिकाणच्या कार्यालये व अन्य स्थानांवर छापे घातले होते. त्यातच हा काळा पैसा सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 12:22 AM2019-12-04T00:22:57+5:302019-12-04T00:23:12+5:30

गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओरिएंटल इंडिया ग्रुपच्या २५ ठिकाणच्या कार्यालये व अन्य स्थानांवर छापे घातले होते. त्यातच हा काळा पैसा सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.

Oriental group in Delhi has 3,000 crore black money? | दिल्लीतील ओरिएंटल ग्रुपकडे ३ हजार कोटींचे काळे धन?

दिल्लीतील ओरिएंटल ग्रुपकडे ३ हजार कोटींचे काळे धन?

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमधील ओरिएंटल इंडिया ग्रुपकडे सापडलेल्या काळया पैशाची रक्कम तब्बल ३ हजार कोटी रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेच (सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्स) कंपनीचे नाव न देता ही माहिती दिली आहे. सीबीडीटीने दिल्ली-एनसीआर भागातील एक कंपनी एवढाच उल्लेख केला आहे.
गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओरिएंटल इंडिया ग्रुपच्या २५ ठिकाणच्या कार्यालये व अन्य स्थानांवर छापे घातले होते. त्यातच हा काळा पैसा सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.
पायाभूत सुविधा, बांधकाम व खाणकाम या क्षेत्रांतील ही मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. छाप्यामध्ये अधिकाऱ्यांना २५0
कोटी रुपयांच्या बेहिशेबी रकमेचा ताळमेळ लागू शकला नसून, तो
काळा पैसा असल्याचे सांगण्यात आले.

मालमत्ता केली जप्त
या कंपनीने ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम काळ्या पैशाच्या रूपात असल्याचे व त्यावरील व्याज भरण्याचे मान्य केल्याचे वृत्त आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाºयांनी पावणेचार कोटी रुपये किमतीची कंपनीची मालमत्ताही हस्तगत केली असून, कंपनीचे विविध बँकांतील ३२ लॉकर्सही सील केले आहेत.

Web Title: Oriental group in Delhi has 3,000 crore black money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.