Lokmat Money > बिझनेस न्यूज > आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलर एफडीआय आणण्याचे उद्दिष्ट -प्रभू

आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलर एफडीआय आणण्याचे उद्दिष्ट -प्रभू

आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणण्याचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 06:24 AM2018-12-28T06:24:46+5:302018-12-28T06:25:07+5:30

आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणण्याचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

 Objective to bring $ 100 billion in FDI in next two years - Pragya | आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलर एफडीआय आणण्याचे उद्दिष्ट -प्रभू

आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलर एफडीआय आणण्याचे उद्दिष्ट -प्रभू

नवी दिल्ली : आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणण्याचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. हे उद्दिष्ट गाठण्यास जपान, दक्षिण कोरिया, चीन व रशिया यासारख्या देशांसाठी विशेष औद्योगिक समूह तयार करणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.
प्रभू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, यासाठी कंपन्या, क्षेत्रे आणि देश आम्ही ठरविले आहेत. आता गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आम्ही रोड शो करणार आहोत. २०१९ मध्ये भारत हा विदेशी गुंतवणुकीचे सर्वोच्च ठिकाण
राहील.
प्रभू यांनी म्हटले की, जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि रशिया यासारख्या देशांसाठी आम्ही औद्योगिक समूह निर्माण करीत आहोत. या देशांतील कंपन्या या समूहांत गुंतवणूक आणि परिचालन करतील. भारतात औद्योगिक पार्क उभारण्यास चीनने मान्य केले आहे. भारतात कारखाने उभारण्यास तयार असलेल्या कंपन्यांची यादी देण्यास चीनला सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे युरो आणि अमेरिका येथील ज्या कंपन्या भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यास तयार आहेत, त्यांचे स्वागत करायलाही भारताला आनंद होईल. त्यांना विशेष दर्जा दिला जाईल.
२०१८ मध्ये भारत सरकारने एफडीआयविषयक नियम
मोठ्या प्रमाणात शिथिल केले
आहेत. जागतिक बँकेने जारी
केलेल्या व्यवसाय करण्यास
सुलभ असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक सुधारून ७७
झाला आहे. आधी तो १३०
होता.

Web Title:  Objective to bring $ 100 billion in FDI in next two years - Pragya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.