Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता नंदन निलेकणी यांनी इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवरून निर्मला सीतारामन यांना दिले उत्तर, म्हणाले...

आता नंदन निलेकणी यांनी इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवरून निर्मला सीतारामन यांना दिले उत्तर, म्हणाले...

New website of Income Tax: प्राप्तिकर खात्याच्या नव्या वेबसाईटमध्ये पहिल्याच दिवशी अनेक तांत्रिक दोष दिसून आल्यानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:23 AM2021-06-09T08:23:32+5:302021-06-09T08:24:19+5:30

New website of Income Tax: प्राप्तिकर खात्याच्या नव्या वेबसाईटमध्ये पहिल्याच दिवशी अनेक तांत्रिक दोष दिसून आल्यानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले होते.

Now Nandan Nilekani replied to Nirmala Sitharaman issue of the new website of Income Tax | आता नंदन निलेकणी यांनी इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवरून निर्मला सीतारामन यांना दिले उत्तर, म्हणाले...

आता नंदन निलेकणी यांनी इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवरून निर्मला सीतारामन यांना दिले उत्तर, म्हणाले...

नवी दिल्ली - बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा असलेली प्राप्तिकर खात्याची नवी वेबसाईट ८ जून रोजी सुरू झाली होती. मात्र पहिल्याच दिवशी या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक दोष दिसून आले. त्यानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले होते. त्याला आता नंदन निलेकणी यांनीही निर्मला सीतारामन यांना उत्तर दिले आहे. (Now Nandan Nilekani replied to Nirmala Sitharaman issue of the new website of  Income Tax )

निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटला उत्तर देताना इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी म्हणाले की, आमच्या कंपनीला सुरुवातीलाच दिसून आलेल्या दोषांबाबत खेद आहे. नवे ई-फायलिंग पोर्टल फायलिंग प्रक्रियेला सोपे बनवेल. तसेच वापरकर्त्यांच्या अनुभवात वाढ करेल. निर्मला सीतारामनजी आम्ही पहिल्याच दिवशी काही दोष पाहिले आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी काम करत आहोत. मात्र ही प्रणाली पुढच्या काही दिवसांतच सुरळीतपणे काम करण्यास सुरुवात करेल.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने पुढील पिढीतील इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टल तयार केले आहे. यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्नसाठी प्रोसेस करण्यासाठी कमी वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इन्कम टॅक्स फाइल करण्यासाठी इन्फोसिसने जी नव्या जनरेशनची वेबसाईट तयार केली आहे. त्याचा नवा यूआरएल- https://www.incometaxindiaefiling.gov.in/home आहे. 
नवी वेबसाईट आठ जून रोजी रात्री ८.४५ वाजता अॅक्टिव्ह झाली होती. मात्र सुरुवातीपासूनच या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडथळे येऊ लागल्याने यूझर्सनी सोशल मीडियावर वेबसाईटचे स्क्रीनशॉट शेअर करून ते वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करण्यास सुरुवात केली होती.  

दरम्यान, मोठा गाजावाजा करून आणि सहा दिवस सर्व्हर बंद ठेवून रिलाँच करण्यात आलेली प्राप्तिकर विभागाची वेबसाईट क्रॅश होत असल्याचे फोटो करदात्यांनी ट्विटरवर टाकल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरच इन्फोसिस आणि कंपनीचे सह संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकनींना चांगलेच सुनावले होते. अशाप्रकारची असुविधा पुन्हा करदात्यांना होता नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. करदात्यांना चांगली सेवा देणे आपली प्राथमिकता असायला हवी, असे त्या म्हणाल्या होत्या. 

Web Title: Now Nandan Nilekani replied to Nirmala Sitharaman issue of the new website of Income Tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.