Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता मुकेश अंबानी इन्शुरन्स क्षेत्रात नशीब आजमावण्याच्या तयरीत, जिओसोबत मोठं प्लॅनिंग

आता मुकेश अंबानी इन्शुरन्स क्षेत्रात नशीब आजमावण्याच्या तयरीत, जिओसोबत मोठं प्लॅनिंग

Mukesh Ambani : रिपोर्ट्सनुसार मुकेश अंबानींनी यासाठी भरती प्रक्रियादेखील सुरू केली आहे. तसंच लवकरच आयआरडीएशी संपर्कही साधण्याची शक्यता आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 02:05 PM2023-03-22T14:05:38+5:302023-03-22T14:06:05+5:30

Mukesh Ambani : रिपोर्ट्सनुसार मुकेश अंबानींनी यासाठी भरती प्रक्रियादेखील सुरू केली आहे. तसंच लवकरच आयआरडीएशी संपर्कही साधण्याची शक्यता आहे. 

Now Mukesh Ambani ready to try his luck in insurance sector health life insurance big planning with Jio | आता मुकेश अंबानी इन्शुरन्स क्षेत्रात नशीब आजमावण्याच्या तयरीत, जिओसोबत मोठं प्लॅनिंग

आता मुकेश अंबानी इन्शुरन्स क्षेत्रात नशीब आजमावण्याच्या तयरीत, जिओसोबत मोठं प्लॅनिंग

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आता विमा क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. लवकरच ते लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात दिसतील. २०४७ पर्यंत इन्शुरन्स फॉर ऑल हे लक्ष्य पूर्ण करण्यात मुकेश अंबानी यांचा मोठा हात असू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून भारतातील विमा व्यवसायात प्रवेश करण्यास पूर्णपणे तयार आहेत. अहवालानुसार, कंपनीने भरती प्रक्रियादेखील सुरू केली आहे. तसंच लवकरच परवान्यासाठी आयआरडीएशी संपर्क साधण्याची अपेक्षा आहे.

ईटी नाऊच्या रिपोर्टमध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आधीच X PSU रिसोर्सेसची नियुक्ती केली आहे. ICICI समूहातील काही मोठी नावंही कंपनीत सामील होण्याची शक्यता आहे. कंपनी लाईफ तसंच नॉन-लाइफ इन्शुरन्स व्यवसायात प्रवेश करेल. कंपनीच्या आगामी एजीएममध्ये रोडमॅपवरून पडदा हटवला जाईल. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की टियर II आणि टियर III शहरांमध्ये तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावेल आणि सरकारने विमा दुरुस्ती कायदा देखील आणणे अपेक्षित आहे. विमा व्यवसायात जिओचा प्रवेश पाहता एलआयसी सारख्या कंपन्याही आपली रणनीती बदलू शकतात.

वर्षभरात जिओ आणि रिटेलचा आयपीओ?
तज्ञांच्या मते, रिलायन्स येत्या १२ महिन्यांत रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचा आयपीओ देखील आणू शकते. त्याआधी, रिलायन्स जिओ लवकरच स्वतःचा 5G फोन देखील लाँच करण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज कंपनी CLSA ची अपेक्षा आहे की रिलायन्स जिओनं वायरलेस ब्रॉडबँड जोडण्यासाठी स्वतःचं पोर्टेबल 5G डिव्हाइस (Jio AirFiber) ऑफर करणं सुरू केलं पाहिजे. याशिवाय २०२३ च्या अखेरीस पॅन इंडिया स्टँड अलोन 5G नेटवर्क लाँचला मॉनेटाईज करण्यासाठी रिलायन्स जिओ आपल्या स्वस्त 5G फोन लाँच करू शकतो असंही त्यांनी म्हटलंय. 

Web Title: Now Mukesh Ambani ready to try his luck in insurance sector health life insurance big planning with Jio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.