Lokmat Money > बिझनेस न्यूज > शुभ वार्ता! UPI वरील पेमेंट्सवर कोणतेही शुक्ल नाही; NPCI चा मोठा खुलासा

शुभ वार्ता! UPI वरील पेमेंट्सवर कोणतेही शुक्ल नाही; NPCI चा मोठा खुलासा

०१ जानेवारी २०२१ पासून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. NPCI निवेदन जारी करून यावर स्पष्टीकरण दिले आहे.  

By देवेश फडके | Published: January 2, 2021 06:06 PM2021-01-02T18:06:13+5:302021-01-02T18:11:13+5:30

०१ जानेवारी २०२१ पासून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. NPCI निवेदन जारी करून यावर स्पष्टीकरण दिले आहे.  

no charges on transaction through upi says npci after some reports | शुभ वार्ता! UPI वरील पेमेंट्सवर कोणतेही शुक्ल नाही; NPCI चा मोठा खुलासा

शुभ वार्ता! UPI वरील पेमेंट्सवर कोणतेही शुक्ल नाही; NPCI चा मोठा खुलासा

HighlightsUPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठा दिलासाNPCI कडून निवेदन जारी करत स्पष्टीकरणचुकीच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता UPI वरून पेमेंट करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोना संकाटामुळे ऑनलाइन व्यवहार करण्यांमध्ये कमालीची भर पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. कोट्यवधी लोकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (UPI) माध्यमातून पेमेंट करण्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, ०१ जानेवारी २०२१ पासून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.  

NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, ०१ जानेवारी २०२१ पासून  UPI च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. चुकीच्या आणि खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. सोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवा, असे आवाहन NPCI कडून यावेळी करण्यात आले. या स्पष्टीकरणानंतर UPI द्वारे व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी युझर्सना दिलासा मिळाला असून, या विनामूल्य सेवेचा वापर करता येणार आहे. 

दरम्यान, डिजिटल व्यवहारांकडे वाढलेला कल पाहता अनेक बँकांनी UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, नववर्षापासून UPI च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याचे वृत्त होते. सोशल मीडियावरही अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या.  यानुसार, आगामी वर्षापासून एका महिन्यात UPI द्वारे २० पेक्षा अधिक व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर २.५ रुपये आणि ५ रुपये शुल्क द्यावे लागतील, असे या व्हायरल वृत्तात सांगितले जात होते. मात्र,  UPI च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासंदर्भातील वृत्त खोटे आहे, असे NPCI कडून जाहीर करण्यात आले.

 

Web Title: no charges on transaction through upi says npci after some reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.