Join us  

युको बँकेचे शेअर्स घसरले

By admin | Published: August 28, 2014 2:58 AM

युको बँकेचे फॉरेन्सिक आॅडिट करण्याचे आदेश दिल्याने या बँकेचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले.

मुंबई : युको बँकेचे फॉरेन्सिक आॅडिट करण्याचे आदेश दिल्याने या बँकेचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले. यामुळे युको बँकेचे बाजार भांडवल ३,१८६.५३ कोटी रुपयांनी घटले. मुंबई शेअर बाजारात युको बँकेचे शेअर्स ८.२४ टक्क्यांनी घसरत प्रति शेअर्सचा भाव ९०.२५ रुपयांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारातही या शेअर्सचा भाव ८९.६० रुपयांवर आला. काही थकीत खात्यांची फॉरेन्सिक चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अलीकडेच सिंडिकेट बँकेचे चेअरमन एस. के. जैन यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर युको बँकेचे फॉरेन्सिक आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बँकेतील थकीत कर्जाचा आकडा जूनपर्यंत ३,३४४.०२ कोटी रुपये होता.