Join us  

व्हिसा अर्जांत यंदा घसरण, एच-१ बी व्हिसाचे १.९० लाख अर्ज मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 1:27 AM

१ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अमेरिकी वित्त वर्षासाठी (वित्त वर्ष २०१९) एच-१ बी व्हिसा देण्यासाठी अमेरिकी नागरिकत्वव आव्रजन सेवा विभागाने बहुप्रतीक्षित लॉटरी प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबई : १ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अमेरिकी वित्त वर्षासाठी (वित्त वर्ष २०१९) एच-१ बी व्हिसा देण्यासाठी अमेरिकी नागरिकत्वव आव्रजन सेवा विभागाने बहुप्रतीक्षित लॉटरी प्रक्रिया सुरू केली आहे. यंदा व्हिसासाठी १.९० लाख अर्ज आले. गेल्या वर्षी २ लाख अर्ज मिळाले होते. याचाच अर्थ यंदा ८,९०२ अर्ज कमी आले असून, अर्जांतील ही घसरण ४.५ टक्के आहे.उपलब्ध एच-१ बी व्हिसांच्या तुलनेत प्राप्त अर्जांची संख्याजास्त असल्यामुळे २०१३-१४पासून लॉटरी पद्धतीने व्हिसा देण्याची पद्धत ‘अमेरिकी नागरिकत्व व आव्रजन सेवे’ने सुुरू केली आहे. यंदासाठीही हीच पद्धत अवलंबिण्यात आली आहे. २०१६-१७मध्ये सर्वाधिक २.३६ लाख अर्ज आले होते. त्या तुलनेत यंदा १९.५ टक्के अर्ज कमी आले आहेत.यंदा २ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी अर्ज स्वीकारण्यात आले. विभागाने म्हटले की, सर्वसाधारण गटातून ६५ हजार एच-१ बी व्हिसा दिले जातात. तसेच दरवर्षी अमेरिकी विद्यापीठांत उच्चशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना स्वतंत्रपणे २० हजार व्हिसा (मास्टर्स कोटा) दिले जातात. या वर्षी या दोन्ही कोटामर्यादा पार करण्याएवढे पुरेसे व्हिसा अर्ज आले आहेत.अर्जांची प्रक्रिया सुरू करताना नागरिकत्व व आव्रजन विभागाने माहिती दिली की, या वर्षीचा कोटा पूर्ण करण्यासाठी ११ एप्रिल रोजी संगणकाच्या साह्याने क्रमरहित निवड पद्धतीने (लॉटरी) अर्ज निवडण्यात आले आहेत. या खेपेस एकूण दोन लॉटरी काढण्यात आल्या. पहिल्यांदा २० हजारांच्या मास्टर्स कोट्यासाठी लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर उरलेल्या अर्जांतून याच पद्धतीने ६५ हजार अर्ज सर्वसाधारण गटासाठी निवडण्यात आले. अशा प्रकारे दुसºया लॉटरीसाठी १.७० लाख अर्ज उपलब्ध होते.आव्रजन कायद्याची तज्ज्ञ संस्था ‘फ्रगोमेन’ने म्हटले की, यंदा प्रत्येक अर्जदाराला सर्वसाधारण कोट्यातून एच-१ बी व्हिसा मिळण्याची ३८ टक्के संधी आहे. मास्टर्स कोट्यातून व्हिसा मिळण्याची संधी ४५ टक्के आहे.>...तर शुल्क परत मिळणार नाहीस्वीकारले न गेलेले अर्ज औपचारिकरीत्या फेटाळणे आणि त्यांचे शुल्क परत करणे याची प्रक्रिया आता ‘अमेरिकी नागरिकत्व व आव्रजन सेवे’कडून सुरू करण्यात आली आहे. अनेक अर्ज भरून नियम मोडणाºयांना मात्र शुल्क परत मिळणार नाही.

टॅग्स :अमेरिकाव्हिसा