Join us

यंदा अतिरिक्त गव्हाचीही सरकारकडून निर्यात नाही

By admin | Updated: February 27, 2015 00:15 IST

यावर्षी सरकार अतिरिक्त गव्हाची निर्यात करणार नाही आणि प्रचंड उत्पादनाच्या अंदाजानंतरही देशांतर्गत बाजारात गव्हाची विक्री सुरूच ठेवील.

नवी दिल्ली : यावर्षी सरकार अतिरिक्त गव्हाची निर्यात करणार नाही आणि प्रचंड उत्पादनाच्या अंदाजानंतरही देशांतर्गत बाजारात गव्हाची विक्री सुरूच ठेवील. खाद्य सचिव सुधीर कुमार यांनी खासगी विक्रेते खुल्या सामान्य परवान्याद्वारे (ओजीएल) गव्हाची निर्यात करू शकतात, असे स्पष्ट केले. सरकारने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी २०११ मध्ये मागे घेतली. त्यानंतर २०१२-२०१३ व २०१३-२०१४ मध्ये अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामातून ६० लाख टन गव्हाची निर्यात झाली होती. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात मात्र अशी निर्यात झालेली नाही. यावर्षी सरकारी पातळीवर कोणतीही निर्यात होणार नाही; परंतु ओजीएलच्या माध्यमातून ती करता येईल, असे सुधीर कुमार म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाची विक्री करणे कितीही व्यावहारिक असले तरी आम्ही तो देशातील बाजारपेठेत विकू, असेही ते म्हणाले.