नवी दिल्ली : केंद्र सरकारने उद्योगिनी योजना २०२५ ला आणखी महिलाकेंद्रित केले आहे. या योजनेअंतर्गत, गरीब महिलांना कोणत्याही तारणाशिवाय ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यात ३०% अनुदानदेखील दिले जात आहे. जर एखाद्या महिलेने ३ लाखांचे कर्ज घेतले तर तिला सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेद्वारे महिला ब्युटी पार्लर, टेलरिंग शॉप्स, किराणा दुकाने, दुग्धव्यवसाय किंवा इतर लघु उद्योग असे स्वतःचे छोटे व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतात.
कोणाला लाभ घेता येणार?
महिलेचे वय १८ ते ५५ वर्षाच्या दरम्यान असावे आणि तिने मागील कोणतेही कर्ज थकवलेले नसावे तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १,५०,००० पेक्षा कमी असले पाहिजे. अपंग आणि विधवांसाठी उत्पन्न मर्यादा नाही.
