जिल्हाधिकारी लक्ष देतील का ?
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST
घाणीचे साम्राज्य़़. स्वच्छतागृहांचा पत्ता नाही़़.पार्किंगची गैरसोय़़. सुरक्षा व्यवस्था नाही़़. कार्यालयाबाहेरच वर्षोनुवर्षे धूळखात पडलेल्या ट्रक, वाळूच्या बोटी़़़ उखडलेले रस्ते,मोकाट जनावरांचा उच्छाद असे चित्र आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील़ महसूल खात्यातील अधिकारी चार चाकीतून येतात आणि जातात त्यामुळे तहसील कार्यालये, उपजिल्हाधिकार्यांची कार्यालये समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत़ याच परिसरातून करोडो रुपयांचा निधी स्वच्छता, रस्ते, वनीकरण, शौचालय बांधकाम, पाणीपुरवठा आदी योजनांसाठी जिल्हाभर दिला जातो; मात्र इथे ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती आह़े संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पाहिला की इथे ‘सुपर क्लास वन आणि क्लास वन’ अधिकारी आहेत असे भासत नाही़ जिल्?ाचे नियोजन येथून केले जाते; मात्र इथले नियोजन करणार कोण असा प्रश्
जिल्हाधिकारी लक्ष देतील का ?
घाणीचे साम्राज्य़़. स्वच्छतागृहांचा पत्ता नाही़़.पार्किंगची गैरसोय़़. सुरक्षा व्यवस्था नाही़़. कार्यालयाबाहेरच वर्षोनुवर्षे धूळखात पडलेल्या ट्रक, वाळूच्या बोटी़़़ उखडलेले रस्ते,मोकाट जनावरांचा उच्छाद असे चित्र आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील़ महसूल खात्यातील अधिकारी चार चाकीतून येतात आणि जातात त्यामुळे तहसील कार्यालये, उपजिल्हाधिकार्यांची कार्यालये समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत़ याच परिसरातून करोडो रुपयांचा निधी स्वच्छता, रस्ते, वनीकरण, शौचालय बांधकाम, पाणीपुरवठा आदी योजनांसाठी जिल्हाभर दिला जातो; मात्र इथे ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती आह़े संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पाहिला की इथे ‘सुपर क्लास वन आणि क्लास वन’ अधिकारी आहेत असे भासत नाही़ जिल्?ाचे नियोजन येथून केले जाते; मात्र इथले नियोजन करणार कोण असा प्रश्न आह़े मूलभूत सुविधांची देखील इथे वानवा आह़े मुळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून समस्या आहेत ते कार्यालयाच्या शेवटच्या टोकापर्यंत़ जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज हजारो लोक येतात; मात्र त्यांच्यासाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे नाहीत़ माहिती कार्यालय, अन्नधान्य वितरण कार्यालय, कृषी कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये तर जायला देखील नको वाटतो़ सेतू कार्यालय, निवडणूक कार्यालय, करमणूक कार्यालय यांच्यासह उपनिबंधक कार्यालयाबाहेरील स्थिती विदारक आह़े प्रत्येक कार्यालयाबाहेर कचरा आणि अजोर्याचे ढीग साचले आहेत़ दैनंदिन साफसफाई होत नसल्यामुळे पिचकार्यांनी रंगल्या आहेत़ आतील कार्यालय चांगले करून चालणार नाही तर बाहेरील परिसर देखील चांगला केला पाहिज़े मंद प्रकाशात सायंकाळ आणि रात्रीच्या वेळी येथे गैरप्रकार चालतात त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयास ‘कॉर्पोरेट लूक ’ देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केला पाहिज़े प्रत्येक शासकीय कार्यालयात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असली पाहिजेत असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र अनेक कार्यालयात ही सुविधा नाही़ नव्या महसूल भवनाचे काम रडत-खडत सुरू आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीही नवे केले जात नाही़ जिल्हा परिषद, तहसील, सेतू, पोलीस मुख्यालय आदी अनेक कार्यालये याच परिसरात असून येथे दररोज हजारो नागरिकांचा लोंढा असतो त्यामुळे या परिसरातील गैरसुविधा दूर करण्यासाठी ‘स्वच्छता मोहीम’ हाती घेणे गरजेचे आह़ेशिवाजी सुरवसे