नवी दिल्ली : किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्ल्या यांनी बँकांचे कर्ज मुद्दाम बुडविल्यानंतर कर्ज वसुलीसाठी सरकार कायदा आणखी कठोर करण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी ‘फौजदारी गुन्हा’ ठरविणारा कायदा करण्यासाठी सरकार विचार करीत आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर भारतीय दंड संहितेअंतर्गत मुद्दाम कर्ज बुडविणाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल होईल. कर्जाची उर्वरित रक्कम भरण्यासाठी कालावधी निश्चित केला जाईल. लवादाची तारीख टाळली जाऊ नये यासाठी असे केले जाणार आहे.
मुद्दाम कर्ज बुडवल्यास खटला चालवणार?
By admin | Updated: March 18, 2016 02:05 IST