सांगावातील रस्त्यांचे रुंदीकरण कधी?
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST
कसबा सांगाव : निवडणुका झाल्या. आता तरी गावच्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण होणार का? की लोकप्रतिनिधी पुन्हा नुसते आश्वासन देणार? असा संतप्त सवाल कसबा सांगाव (ता. कागल) येथील ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
सांगावातील रस्त्यांचे रुंदीकरण कधी?
कसबा सांगाव : निवडणुका झाल्या. आता तरी गावच्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण होणार का? की लोकप्रतिनिधी पुन्हा नुसते आश्वासन देणार? असा संतप्त सवाल कसबा सांगाव (ता. कागल) येथील ग्रामस्थांतून विचारला जात आहे.कसबा सांगाव परिसरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. निढोरी-इचलकरंजी या सांगावमधील प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांतून होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.गावच्या निवडणुकीसह लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत या रस्त्याच्या रुंदीकरणाचे गाजर गावकर्यांना दाखवले जात आहे. मात्र, अद्याप रुंदीकरणाला मुहूर्त मिळालाच नाही. आकस्मितपणे यू टर्न घेत लोकप्रतिनिधींनी हा गावचा रस्ता वगळून गावच्या दक्षिणेकडून शेती विभागातून रस्ता करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, या नवीन रस्त्यामुळे गावचे बहुतांश अर्थकारण बदलणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसभेमधून गावामधीलच रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी आणि ठराव करण्यात आले आहेत. मात्र, यावर लोकप्रतिनिधी गप्प आहेत. त्यामुळे याबाबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम खात्याकडे गत २० वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४० लाख पडून आहेत. त्यामध्ये ????? ६० ते ७० लाखांचा निधी मंजूर करून याच रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी होत आहे. दोन्ही बाजूच्या मिळकतधारकांनीदेखील आतापासून पाच-दहा फूट जागा सोडल्या आहेत. तरीही रस्त्याच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे.-----------------------फोटो : अरुंद रस्ता आणि वाढत्या रहदारीमुळे वाहनांच्या अशा लागलेल्या रांगा. (छाया : संजय कांबळे)