पावसाळ्यातही शहापूर तालुक्यात पाणी टंचाई
By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST
- ग्रामसेवकांची आज तातडीने बैठक
पावसाळ्यातही शहापूर तालुक्यात पाणी टंचाई
- ग्रामसेवकांची आज तातडीने बैठक- १९ गाव ७० पाड्यांना पाणी टंचाईभातसानगर - जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने १९ गाव ७ पाड्यांना अजूनही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. रिमझीम तर एखाद्या सरीने दलदलयुक्त झालेल्या रस्त्यांमुळे विहिरींकडे टँकरही जात नसल्याने या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी गटविकास अधिकारी सी.व्ही. खंदारे यांनी तालुक्यातील ग्रामसेवकांची तातडीने सभा बोलविली आहे.शहापूर तालुक्यातील १९ गाव ७० पाड्यांना आजही पाणीटंचाई आहे. मागील वर्षी ३ जून पासूनच टँकरने पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र या वर्षी रिमझीम तर कधी एखाद दुसरी पावसाची सर यामुळे जमीन ओली झाली तर कोठे निसरडी, मात्र जमीनीत पाणी न मुरल्याने ओलावा निर्माण झाला नाही. त्यामुळे विहीरींतील झर्यांनाही पाणी नसल्याने उन्हाळा सारख्या आजही विहीरी कोरड्याच आहेत. मात्र टँकरने पाणीपुरवठा करणेही अशक्य झाले आहे.ओल्या व निसरड्या जमिनीमुळे टँकर मातीत रुतून बसल्याने आता काय उपाययोजना करता येईल यासाठी शहापूर गट विकास अधिकारी सी.व्ही. खंदारे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांी तातडीने सभा आयोजित केली आहे.(वार्ताहर)जनार्दन भेरे