Join us  

वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्याने कर्मचारी बनले मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:29 AM

अमेरिकेतील वॉलमार्टने भारतातील सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्याचा मोठा आर्थिक फायदा फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांनाही झाला आहे. वॉलमार्टने २२ अब्ज डॉलर्सना फ्लिपकार्ट खरेदी केल्यामुळे फ्लिपकार्टच्या कर्मचा-यांच्या संपत्तीत मोठी वाढ होणार आहे.

नवी दिल्ली  - अमेरिकेतील वॉलमार्टने भारतातील सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्याचा मोठा आर्थिक फायदा फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांनाही झाला आहे. वॉलमार्टने २२ अब्ज डॉलर्सना फ्लिपकार्ट खरेदी केल्यामुळे फ्लिपकार्टच्या कर्मचा-यांच्या संपत्तीत मोठी वाढ होणार आहे. या व्यवहारामुळे एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लानमधील (ईसॉप्स) संपत्तीचे मूल्य तब्बल १३ हजार ४५५ कोटी म्हणजेच २२ अब्ज डॉलर्सपर्यंत गेले आहे.फ्लिपकार्टच्या सुमारे १00 आजी-माजी कर्मचा-यांकडे ईसॉप्स आहेत. या ईसॉप्सच्या किमतीत मोठी वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ईसॉप्ससाठी वॉलमार्ट १00 टक्के बायबॅक आॅफर आणणार आहे. त्यामुळे कंपनीचे समभाग असलेल्या कर्मचा-याला एका समभागामागे १५0 डॉलर्स म्हणजेच १0 हजार रुपये मिळतील.मात्र आपल्याकडील समभाग विकायचे की नाहीत, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या कर्मचाºयांना असेल. परिणामी, कंपनीचे अनेक आजी-माजी कर्मचारी कोट्यधीश होतील. हा फायदा होणाºयांमध्ये फोनपेचे सीईओ व संस्थापक समीर निगम, फ्लिपकार्टच्या तंत्रज्ञान विभागाचे माजी प्रमुख अधिकारी आमोद मालवीय, वेबफॉर्म उडानच्या आॅपरेशन्स विभागाचे माजी अध्यक्ष सुजित कुमार यांचाही समावेश आहे.समभागांमुळे संपत्तीत वाढगेल्या चार वर्षांपासून फ्लिपकार्ट आपल्या कर्मचा-यांना कंपनीचे समभाग देत असे. कर्मचा-यांना दर महिन्याला हे समभाग कंपनीला परत विकण्याची मुभा होती. फ्लिपकार्टसह अनेक कंपन्या कर्मचा-यांना समभाग देत असतात. त्यामुळे कर्मचा-यांच्या संपत्तीतही सतत वाढ होत असे. या पद्धतीने कर्मचा-यांना समभाग देऊन त्यांच्या संपत्तीत वाढ करण्यात इन्फोसिस ही पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे.

टॅग्स :फ्लिपकार्टबाजारव्यवसाय