Join us

वडगावला पावसाने झोडपले...

By admin | Updated: June 2, 2014 23:43 IST

पेठवडगाव : वडगाव शहर परिसराला मुसळधार पावसाने आज (सोमवार) झोडपले. वीज व वार्‍यासह मुसळधार पावसाने रात्रीच्या सुमारास वळवाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारास आलेल्या व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली.

पेठवडगाव : वडगाव शहर परिसराला मुसळधार पावसाने आज (सोमवार) झोडपले. वीज व वार्‍यासह मुसळधार पावसाने रात्रीच्या सुमारास वळवाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारास आलेल्या व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली.
आज, सोमवारी सकाळपासूनच हवामानात उष्मा जाणवत होता. तसेच ढगाळ वातावरण होते. आज सात वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली.
त्यात बाजारासाठी आलेल्या व्यापारी, नागरिक यांची तारांबळ उडाली. पावसापासून साहित्याचा बचाव करण्यासाठी व्यापारी कसरत करीत होता.
प्रतिनिधी.