Join us  

व्हीआयटीचा समावेश भारतातील पहिल्या नऊ संस्थांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 2:31 AM

या यादीमध्ये भारतातील १५ संस्थांचा समावेश असून, त्यामध्ये व्हीआयटीला नववे स्थान प्राप्त झाले आहे.

मुंबई : शांघाय रँकिंग कन्सल्टन्सीने जाहीर केलेल्या जगातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीत वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी)चे स्थान उंचावले आहे. या यादीमध्ये भारतातील १५ संस्थांचा समावेश असून, त्यामध्ये व्हीआयटीला नववे स्थान प्राप्त झाले आहे.विद्यापीठांचे जागतिक अकॅडमिक रँकिंग (एआरडब्ल्यूयू) १५ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये व्हीआयटीचा समावेश ८०१ ते ९०० या रँकमध्ये झाला आहे. मागील वर्षी ९०१ ते १००० यामध्ये व्हीआयटी होती. आमचे फॅकल्टी आणि रिसर्च फेलो हे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करीत असल्याने हा मान मिळाल्याचे व्हीआयटीचेचॅन्सलर डॉ. जी. विश्वनाथन यांनी सांगितले. (वा.प्र.)