मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजी विक्रेत्यांचा हल्ला वाहनांची तोडफोड; कर्मचारी जखमी
By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST
अकोला : स्थानिक जठारपेठ चौकातील भाजी विके्रत्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजी विके्रत्यांनी हल्ला चढवला. वाहनांवर केलेल्या दगडफेकीत मनपाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या बाबीची माहिती मिळताच आयुक्त, उपायुक्त, क्षेत्रीय अधिकार्यांसह संपूर्ण मनपा कर्मचार्यांनी घटनास्थळावर धाव घेत, नव्या जोमाने परिसरातील अतिक्रमणाचा सफाया केला. यामध्ये भाजी विके्रत्यांच्या हातगाड्यांचा अक्षरश: चुराडा करण्यात आला.
मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजी विक्रेत्यांचा हल्ला वाहनांची तोडफोड; कर्मचारी जखमी
अकोला : स्थानिक जठारपेठ चौकातील भाजी विके्रत्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजी विके्रत्यांनी हल्ला चढवला. वाहनांवर केलेल्या दगडफेकीत मनपाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या बाबीची माहिती मिळताच आयुक्त, उपायुक्त, क्षेत्रीय अधिकार्यांसह संपूर्ण मनपा कर्मचार्यांनी घटनास्थळावर धाव घेत, नव्या जोमाने परिसरातील अतिक्रमणाचा सफाया केला. यामध्ये भाजी विके्रत्यांच्या हातगाड्यांचा अक्षरश: चुराडा करण्यात आला. शहरातील अत्यंत रहदारीचा रस्ता असलेल्या जठारपेठ चौकात भर रस्त्यावर भाजी विके्रत्यांनी बाजार मांडला आहे. स्थानिक रहिवाशांनी हटकल्यास त्यांना शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे असंख्य तक्रारी केल्या; परंतु प्रशासनाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे भाजी विके्रत्यांनी माजी आरोग्यमंत्री डॉ. प्रमिलाताई टोपले यांच्या खासगी हॉस्पिटलसह परिसरातील व्यावसायिक संकुल व रहिवासी इमारतींच्या समोर ठिय्या मांडला. यावर उपाय म्हणून मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी भाजी विके्रत्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु हा प्रस्ताव धुडकावून लावत भाजी विके्रत्यांनी याच ठिकाणी व्यवसाय करण्याला पसंती दिली. परिणामी आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी स्वत: गुरुवारी या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. यादरम्यान, मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक शुक्रवारी सकाळी या ठिकाणी गस्त घालण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर भाजी विके्रत्यांनी प्रचंड दगडफेक करीत हल्ला चढवला. यामध्ये टिप्पर चालक अशोक मुरदुंगे, सूर्यकांत बन्सोड व जेसीबी चालक मधुकर कांबळे जखमी झाले. यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली. अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात नागरिकांची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, उपायुक्त डॉ.उत्कर्ष गुटे, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर गुल्हाणे, शहर अभियंता अजय गुजर, कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर, सहाय्यक नगर रचनाकार संदीप गावंडे, कार्यकारी अधिकारी नंदलाल मेश्राम, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, जी.एम.पांडे, कैलास पुंडे, राजेंद्र घनबहाद्दूर यांसह झाडून पुसून सर्व कर्मचार्यांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. या घटनेमुळे खचून न जाता प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने संपूर्ण परिसरातील अतिक्रमणाचा सफाया केला. यावेळी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार, रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे पोलिस ताफ्यासह हजर होते.